वन प्लस ९ ची भारतात धमाकेदार लाँचिंग
आघाडीची स्मार्टफोन कंपनी OnePlus ने अखेर भारतात आपली लेटेस्ट OnePlus 9 Series लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने बहुप्रतिक्षित वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9आर (OnePlus 9, OnePlus 9 PRO, OnePlus 9R) हे तीन स्मार्टफोन आणलेत.
OnePlus 9 सीरिजसोबतच कंपनीने भारतीय मार्केटमध्ये OnePlus Watch देखील आणलं आहे.
OnePlus 9 स्पेसिफिकेशन्स :
OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ Fluid AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेला प्रोटेक्शनसाठी
यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास असून फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल.
5G कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट असलेल्या OnePlus 9 च्या 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 49 हजार 999 रुपये ठेवली आहे.
तर, 12GB+ 256 GB व्हेरिअंटची किंमत 54 हजार 999 रुपये आहे.
OnePlus 9R स्पेसिफिकेशन्स:
OnePlus 9R मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ Fluid AMOLED डिस्प्ले आहे.
हा फोन Android v11 ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असून यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे.
शिवाय 5G कनेक्टिव्हिटीचाही सपोर्ट फोनला आहे. याच्या 8GB रॅम + 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे.
तर, 12GB रॅम + 256GB इंटर्नल स्टोरेज मॉडेलची किंमत 43 हजार 999 रुपये आहे.
OnePlus 9 Pro स्पेसिफिकेशन्स :
OnePlus 9 Pro मध्ये 6.7 इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले असून पंच-होल डिझाइन आहे.
फोनमध्ये अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित Oxygen OS 11 चा सपोर्ट आहे,
शिवाय ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरही आहे. यात 12 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज आहे.
हा फोन Carbon Black आणि Lake Blue अशा दोन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल.