जुन्या गाडीचे नोंदणीकरण करताना आता भरावे लागणार ८ पट पैसे
येत्या ऑक्टोबर महिन्यापासून नागरिकांना १५ वर्षांहून जुन्या गाडीच्या नोंदणीचे नूतनीकरण करतांना तब्बल ५००० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्याच्या दराच्या तुलनेत ही किंमत आठ पट आहे. तसेच जुन्या दुचाकीचे नोंदणीचे नूतनीकरण ऑक्टोबर पासून १००० रुपयात करण्यात येईल. सध्या आहे ३०० रुपयात करून मिळते.
पंधरा वर्ष जुन्या बस किंवा ट्रक साठी फिटनेस नूतनीकरण प्रमाणपत्र ऑक्टोबरपासून १२,५०० रुपयात मिळेल जे आत्ताच्या मोबदला पेक्षा २१ पट जास्त आहे.
रस्ते व वाहतूक मंत्रालयाने वेहिकल स्क्रापेज पोलिसी च्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या एकूण योजनेचा एक भाग म्हणून ही दर वाढ प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावानुसार खाजगी वाहनांचा नूतनीकरणतील विलंब झाल्यास दरमहा ३०० ते ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल तर व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणास उशीर झाल्यास दररोज ५० रुपये दंड आकारला जाईल.
जुन्या प्रदूषण करणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने काढायचा नवीन प्रस्ताव द्यायला सरकारने सुरू केले आहे त्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागात १० आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या डिझेल आणि पेट्रोल वाहनांच्या बंदीचा आढावा घेण्यासाठी सरकार एनजीटी आणि सर्वोच्च न्यायालयाशी संपर्क साधेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. “जर सरकार जुन्या प्रदूषण करणार्या वाहनांचे नियोजन करण्याचे धोरण आणत असेल तर ते संपूर्ण देशासाठी समान असले पाहिजे.” असे ग्राहक कार्यकर्ते अनिल सुद यांनी सांगितले.
खाजगी वाहनांचा बाबतीत मालकांनी १५ वर्ष झाल्यानंतर दर ५ वर्षांनी आरसी म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे व्यवसायिक वाहनांचे ८ वर्ष झाल्यावर फिटनेस प्रमाणपत्राचे नुतनीकरण दरवर्षी करणे अनिवार्य आहे. फिटनेस चाचणी उत्तीर्ण होऊ न शकणारा वाहनांना स्क्रॅप करण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी मंत्रालय नोंदणीकृत वाहन स्क्रापिंग सेंटरची स्थापना करणार आहे. प्रस्तावानुसार वाहन मालकांना जुने वाहन कोणत्याही स्क्रापिंग सेंटरमध्ये न्यायची सुट असेल व स्क्रापिंग प्रमाणपत्र ते दुसऱ्या कोणाच्या नावावर नवीन गाडी घेण्यास सूट मिळावी म्हणून करू शकतात.