कशी ठरते तेलाची किंमत?
बिजनेस बाराखडी भाग २
सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय डिझेल, पेट्रोलच्या वाढत्या किंमती हाच आहे. पेट्रोलने नुकतीच शंभरी गाठली आहे. पण तेलाचे भाव नेमके कसे वाढतात? त्यांच्या किंमती कोण ठरवतं?
याबद्दल जाणून घेऊया आजच्या मार्केट बाराखडीच्या दुस-या भागात…..
क्रूड ऑईल
एखादं राष्ट्र तेल विकत घेतं म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल विकत घेत नसून कच्च तेल विकत घेत असत. यालाच कृड ऑईल अस म्हणतात. कच्च्या तेलाची शुध्दीकरण प्रक्रिया करून त्यामधून पेट्रोल, डिझेल, केरोसीन, मतीचं तेल इत्यादी इंधन काढल जात. जगात सर्वाधिक तेलाची निर्यात अरब राष्ट्रांकडून केली जाते. कारण अरब राष्ट्रांमध्ये तेलाचा सर्वाधिक साठा आहे.
ओपेक ( OPEC)
ओपेक ( ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज ) हे कच्या तेलाचा व्यापार करणाऱ्या १४ देशांची संघटना आहे. ज्यामध्ये अल्जेरिया, अंगोला, काँगो, एक्वेटोरिया, गिनिया, गॅबॉन, इराण, इराक, कुवैत, लिबिया, नायजेरिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीरात, व्हेनेझुएला हे देश समाविष्ट आहे. तेल निर्यातीवर अर्थकारणाची सूत्रे हाताळण्यासाठी १९६० ला ओपेक ची स्थापना करण्यात आली होती. जगातील तेलाच्या पुरवठ्यापैकी ४०% टक्के पुरवठा ओपेक राष्ट्रांद्वारे केला जातो.
तेलाच्या किमतीचे सूत्र
जगभरात तेलाच्या किमती सतत बदलत असतात. तेलाची किंमत प्रती बॅरल क्या हिशोबाने ठरवली जाते. एका बॅरल मधे जवळपास १५९ लिटर कच्च तेल असतं.तेलाची किंमत प्रमुख्याने ४ घटकांमुळे निर्धारित होते त्या म्हणजे मागणी व पुरवठा, उत्पादनाची प्रक्रिया, भौगोलिक व राजकीय परिस्थिती, आणि फायनान्स बाजार.
१. मागणी व पुरवठा
मागणी व पुरवठा हा अर्थशास्त्रातील अत्यंत मूलभूत घटक आहे. जशी जशी मागणी वाढत जाते तशी तशी वस्तूची विक्री किंमत पण वाढत जाते. मागणी घटली की किंमत पण घटते. पुरवठा आणि किंमतीच याउलट असत. पुरवठा मागणीच्या तुलनेत जास्त झाला की किमती पडतात. तेलाच्या किमती मध्ये पण मागणी व पुरवठा हा महत्वपूर्ण घटक असतो. भारतात मागील दोन दशकांपासून मागणीत सतत वाढ होत असल्याने तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. करोना च्या लॉकडाऊन काळात सर्वच देशात तेलाची मागणी कमी झाल्याने भाव प्रचंड कोसळले होते.
२.उत्पादनाची प्रक्रिया
तेलाच्या किमती मागणी पुरवठा प्रमाणेच उत्पादनाच्या प्रक्रिया आणि परिस्थितीवरही अवलंबून असते. अवघड भौगोलिक ठिकाण व पर्यावरणीय परिस्थितीतून तेल काढल जाते त्यामुळे किमतीत वाढ होते. कोल समुद्र आणि थंड प्रदेशातून उत्पादन केलेल्या तेलाची किंमत सर्वाधिक असते.
३.राजकीय परिस्थिती
जगाच्या काना कोपऱ्यात सुरू असलेल्या राजकीय , सामजिक परिस्थितीचा तेलावर परिणाम पडतो. प्रामुख्याने तेल निर्यात देशात सुरू असलेल्या तणावाचा मोठा परिणाम तेलावर होतो. सीरिया, इराण मधील दहशतवाद्यांनी तेलाच्या विहिरींवर कब्जा केलेला होता तेव्हा तेलाची किंमत १५० डॉलर प्रति बॅरल इतकी झाली होती कारण पुरवठा पडला होता. लिबिया, सीरिया, आणि येमेन आता त्यांच्याकडे सुरू असलेल्या राजकीय तणावामुळे तेल निर्यात करणाऱ्या देशांमधून बाहेर पडले आहेत.
४.आर्थिक बाजार
वरील ३ घटकांपेक्षा आर्थिक बाजाराचा तेल किमतींवर परिणाम होत नसला तरीही आर्थिक बाजार दिवसेंदिवस महत्वपूर्ण होत चालला आहे. निवेशक तेलाच्या किंमती वर होईल की खाली यावर एक प्रकारचा सट्टा खेळत असतात. काही नीवेशक तेलामध्ये फ्युचर ट्रेडिंग करतात म्हणजे सध्याच्या किमतींवर ते भविष्यासाठी तेल विकत घेऊन ठेवतात. बहुतेक एअरलाइन्स कंपन्या भविष्यात तेलाची किंमत वाढेल या भीतीने फ्युचर ट्रेडिंग करतात. फ्युचर ट्रेडिंग ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.