‘न्याय द जस्टिस’चा टीझर रिलीज,सुशांतसिंग राजपूतच्या जिवनावर बायोपिक
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर बराच काळ गेला आहे.
परंतु अद्याप या खटल्याचा निर्णय झालेला नाही. सीबीआय सध्या सुशांतच्या निधनाची चौकशी करीत आहे.
यादरम्यान अभिनेताच्या मृत्यूबद्दल न्याय: द जस्टिस या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट सुशांतसिंग राजपूत यांच्या जीवनावर आधारित आहे.
न्याय; द जस्टिस या सिनेमाची निर्मिती विकास प्रॉडक्शनने केली आहे.
या सिनेमाची कथा सुशांतचा मृत्यू कसा झाला या प्रश्नाभोवतीच गुंफलेली आहे. या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे.
५८ सेकंदांचा हा टिझर उत्कंठावर्धक आहे. त्याने आपल्या घरी आत्महत्या केली असते.
हा टिझर जसा जसा पुढे जातो तसे तसे सुशांत मृत्यूप्रकरणातील सर्व घटना आपल्याला आठवू लागतात.
ज्याप्रमाणे सुशांतच्या केसचा तपास देशातील तीन शक्तीशाली तपासयंत्रणा करत होत्या, तसेच या टिझरमध्येही दाखवले आहे.
सिनेमाचे निर्माते दिलीप गुलाटींनी सांगितले, ‘सुशांतच्या मृत्यूचू बातमी ऐकून मी सुन्न झालो होतो. मी त्याला व्यक्तिशः ओळखत नव्हतो
परंतु त्याच्या जाण्याने माझ्या जवळची व्यक्ती गेल्याची भावना मनात आली होती.
या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना आम्ही सांगू इच्छितो की आत्महत्या करणे हा कोणत्याही समस्येवरील उपाय असू शकत नाही.
चित्रपटातील अनेक कलाकार आहे .अभिनेता झुबीर खान या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतच्या भूमिकेत आहेत तर रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारत आहेत.
याशिवाय चित्रपटातील बरीच मोठी नावे अशीरानी, अमन वर्मा, शक्ती कपूर, सुधा चंद्रनन, किरण कुमार, रझा मुराद आणि सोमी खान अशी आहेत.
हा चित्रपट ११ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.