पॉलिटीक्स

एन व्ही रमण नवे सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे लवकरच सेवा निवृत्त होणार आहे. नवीन सरन्यायाधीश पदाची  नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी शिफारस नाव मागविण्यात आलं होतं. त्यानंतर सरन्यायाधाशी बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात अखेरीस म्हणजे २३ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीचीप्रक्रिया सुरू केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली जाते. सध्या शरद बोबडे यांच्यानंतरएन.व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.६४ वर्षीय रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. पोन्नावरम हे गाव कृष्णा जिल्ह्यात येते. त्यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्या वकीली व्यवसायाला सुरूवात केली. न्यायमूर्ती रमण यांनी यांचं बी.एस्सी, बी.ए एल.एल बी  शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी विशेष काम केलेलं आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *