उत्तर कोरियाची ऑलिम्पिकमधून माघार
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे उत्तर कोरियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पोर्ट्स वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना आजारामुळे ऑलिम्पिकमधून माघार घेणार पहिला मोठा देश होऊ शकेल.
जुलै महिन्यात सुरू होणा-या ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याचा निर्णय देशाच्या ऑलिंपिक समितीने २५ मार्च रोजी घेतला.
उत्तर कोरियाच्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या स्पोर्ट्स इन डीपीआरने या जागतिक आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर
खेळाडूंना संरक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले.
२०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकले होते. १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या सोव्हिएतच्या नेतृत्वाखालील बहिष्कारात ते सामील झाले
आणि प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियामध्ये १९८८ झालेल्या ऑलिम्पिक मधून देखील त्यांनी माघार घेतली होती.
१९८८ नंतर ऑलिम्पिक न खेळण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असेल.
तसेच संयुक्तपणे ऑलिम्पिक मध्ये भाग घेण्याच्या दक्षिण कोरिया च्या मेहनतीवर देखील पाणी पडले.
ह्या वर्षीच्या स्पर्धेत दोन्ही संघा संयुक्तपणे ऑलिम्पिक मध्ये भाग घ्यावा असे दक्षिण कोरिया च प्रयत्न होता.
२५ मार्च रोजी उत्तर कोरियाई ऑलिम्पिक समितीच्या एका व्हिडिओ बैठकीत सदस्यांनी “आपल्या सन्मानित देशाचा गौरव व्हावा
यासाठी नवीन पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये आणखी पदके जिंकण्याचे आवाहन केले,” राज्याचे अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी टोकियो ऑलिम्पिकचा उल्लेख न केल्यामुळे ते ऑलिम्पिक मध्ये भाग घेतली की नाही यावर सर्वानाच शंका होती.