इकॉनॉमी

कर्मचार्‍यांची काळजी सरकार घेईल:अर्थमंत्री निर्मला सीतारमण

बँकांचा खाजगी करणावरील वक्तव्य

सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना खाजगीकरणामुळे कुठलेही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल असे मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

“खाजगीकरण होण्याची शक्यता असलेल्या बँकांच्या कामगारांचे हीत पूर्णपणे जपले जाईल. त्यांचे पगार, वेतनमान पेन्शन या सर्वांची काळजी घेतली जाईल.” असे सीतारमण म्हणाल्या.

“आम्ही एक सार्वजनिक उद्यम धोरण म्हणजेच पब्लिक एंटरप्राइज पोलिसी जाहीर केले आहे. यामध्ये आम्ही चार क्षेत्रे निवडली आहेत ज्यात सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकार कार्यरत असेल.

यामध्ये वित्तीय क्षेत्र देखील आहे. सर्व बँकांचे खाजगीकरण होणार नाही. ज्यांचे खाजगीकरण व्हायची शक्यता आहे त्या बँकांचा कर्मचाऱ्यांचे हित नक्कीच जपल्या जाईल.

“असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेच्या मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीईए) बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

“ज्या बँकांचे खाजगीकरण होण्याची शक्यता आहे त्यांचे खासगीकरण झाल्यानंतरही खासगी संस्था कार्यरत राहतील कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल” असेही त्या पुढे म्हणाल्या

पायाभूत सुविधा अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात गुंतवणुकीसाठी निधी उत्पन्न करण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूट (डी एफ आय) स्थापन करण्याचा विधेयकास मंजुरी

देणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अर्थमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.

गेल्या दोन दिवसांपासून खाजगीकरणाच्या विरोधात बँकांचा संप सुरू आहे. अशा परिस्थितीत हे वक्तव्य कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *