देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींची पाच कलमी योजना
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आणि अगदी थोड्याच काळात दुपटीने रूग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली.
राज्य सरकार पुरेशा प्रमाणात लसीकरण करत नाहीत म्हणून केंद्र सरकार यावर तीव्र नाराज आहे. ७.६० कोटी लोकांचे आजवर लसीकरण झाले आहे.
म्हणजेच ७८ दिवसांत रोज सुमारे ९.८० लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
भारताने जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत एकदम पाहिले स्थान मिळवल्यामुळे आणि देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेत नुकतीच पाच कलमी योजना जाहीर केली.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोविड आणि लसीकरण यावर सादरीकरण केले गेले.
चाचण्या, रुग्णांचा शोध घेणे, उपचार, कोविड रोखण्यासाठी योग्य वर्तन आणि लसीकरण या पाच सूत्रांची योजना मोदी यांनी केली.
देशातील एकूण रुग्ण संख्यात केवळ १० राज्यांचा ९१ टक्के वाटा असल्याने सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे ही संख्या कमी करणे हे सरकार आणि जनता सर्वांचेच प्रथम उद्दिष्ट आहे. या पाच सूत्रांच्या आधारे रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
रुग्णसंख्येच्या ९१ टक्के भागापैकी सुमारे ५७ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असून गेल्या १४ दिवसांत झालेल्या मृत्यू मध्ये ४७ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.
पंजाब आणि हरियाणा मध्येही मृतांची संख्या अधिक असल्याने या तीन राज्यांना केंद्राच्या तुकड्या भेट देणार आहेत.
देशात कोरोना रुग्णांची अचानक झालेली वाढ आणि यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयांची आणि नियमांची कठोरपणे
अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारांना आलेल्या अपयाशाबद्दल मोदींनी चिंता व्यक्त केली.
सार्वजनिक ठिकाणी लोक कोरोना नियमांची पायमल्ली करत असतील तर त्यांना दंड ठोठावणे,
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोजक्या प्रवाशांना परवानगी द्यावी, कंटेनमेंट झोन तयार करावे आणि सामाजिक, धार्मिक, जत्रा, बाजार
यांसारख्या ठिकाणी राज्य सरकारांनी बंधने घालवीत अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.
ही बंधने नसतील तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणणे कठीण होणार आहे.
सहा ते चौदा एप्रिल दरम्यान मास्कचा १०० टक्के वापर, वैयक्तिक, सामाजिक आणि कामाच्या ठिकाणची स्वच्छता, तसेच आरोग्याच्या
सुविधा निश्चितपणे राहतील यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
मोदी यांनी आचासंहितेची परिणामकारक आंमलबजावणी झाली पाहिजे यावर अधिक भर दिला आहे.
कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आणि कंटेंनमेंट झोन तयार करण्यासाठी सामाजिक कर्त्यांनिही सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.