नांदेड मध्ये पोलिसांवर हल्ला:धार्मिक मिरवणूक रोखल्यामुळे जमावाने केला पोलीसांवर लाठ्यांचा वर्षाव
महाराष्ट्रातील नांदेडमध्ये धार्मिक मिरवणुका रोखल्यामुळे पोलिसांवर गुरुवारी जमावाने हल्ला केला. यात ४ पोलिस जखमी झाले.
महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली गेली आहे.
सोमवारी होला मोहल्ला आयोजित करण्यासाठी शेकडो लोक गुरुद्वाराच्या आवारात जमा झाले होते. स्त्रिया होत्या. पोलिसांनी थांबविताच ते भडकले.
जमावाने बॅरिकेड्स तोडले आणि रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यांनी अमानुष पणे पोलिसांना मारहाण केली.
बर्याच लोकांच्या हातात तलवारी सुद्धा होत्या. यावेळी मोठ्या संख्येने पपोलिस बल तैनात करण्यात आले होते पण ते गर्दीच्या तुलनेत कमी पडले.
नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणाले की कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्ये मुळे घातलेल्या निर्बंधांमुळे होला मोहल्लाला परवानगी नव्हती.
यावर गुरुद्वारा समितीने ते हा कार्यक्रम गुरुद्वारा च्या आवारात घेतील असे आश्वासन दिले होते.
संध्याकाळी चार वाजता निशान साहिब यांना गेटवर आणले असता लोकांनी मिरवणुकीसाठी वाद घालण्यास सुरवात केली.
पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न केला तेव्हा ३००-४०० लोकांनी गेट तोडून पोलिसांवर हल्ला केला.
यात चार पोलिस जखमी झाले. हिंसक जमावाने वाहनांची तोडफोड देखील केली. याप्रकरणी एफआयआरचा( FIR) नोंदावल्या गेली आहे