झारखंड व छत्तीसगढ येथे नक्षलवाद्याच्या हल्ल्यात चार सैनिक ठार
काल नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात छत्तीसगढ येथील दंतेवाडा परिसरात पोलीस दलाचा एक जवान शहीद झाला . सुरक्षा दलाचे संयुक्त पथक दंतेवाडा जिल्ह्यातील पहूरनगर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी सुरक्षारक्षक म्हणून तैनात होते परंतु नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भुसुरुंगाचा स्फोट होऊन त्यात हा सैनिक शहीद झाला.
तिस-या घटनेत झारखंड जिल्ह्यातील सिंघभुम जिल्ह्यात जुग्वॉस आणि केंद्रिय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त पथकाने सिंघभुम परिसरात नक्षलवाध्याविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. त्यातच झालेल्या झटपतीत तीन जवान शहीद तर दोन जखमी झाले.