Uncategorized

घरच्या घरी करा आकर्षक नेल आर्ट

आपण नेहमीच अगदी नखशिखांत सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. मग नखांना विसरून कसं चालेल. डिझाईनर ड्रेसेस, हाय हिल्स, पार्लरला जाणं आणि नेहमी स्टाईलिश आणि सुंदर दिसणं हे करत असताना नखांची सौंदर्य विसरू नका. कारण आजकाल तुमच्या अक्सेसरीज इतकंच महत्त्व तुमच्या नखांनाही प्राप्त झालं आहे.
नेल आर्टमधील काही आकर्षक पॅटर्न्स

१) पोल्का डॉट नेल आर्ट (Polka Dot Nail Art)
पोल्का डॉट नेल आर्ट हे नेहमीच ट्रेंडमध्ये असलेलं नेल आर्ट आहे. यासाठी तुम्हाला आधी एक न्यूड नेल कलरची गरज लागेल. ज्यावर तुम्ही व्हाईट नेल कलरने पोल्का डॉट्स बनवू शकता. हे डिझाईन तुम्ही टूथ पिकचा वापर करूनही बनवू शकता.

२) मिक्स अँड मॅच नेल आर्ट (Mix And Match Nail Art)
जर तुमच्याकडे नेलआर्ट टूल्स किंवा फंकी शेड्स नसतील तर तुम्ही मिक्स अँड मॅच करून तुमच्या नखांना सुंदर बनवू शकता. यामध्ये महत्त्व असते ते रंगांच्या कॉम्बिनेशनला. आपल्या स्टाईल स्टेटमेंटनुसार तुम्ही नखांवर वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकता.

३) ग्लिटरी नेल आर्ट (Glittery Nail Art)
या नेलआर्टचं वैशिष्ट्य म्हणजे हे लावणं खूपच सोपं आहे. हे लावल्यावर तुमच्या नखांना बोल्ड लुकही मिळतो. तुमची आवडती न्यूड शेड नखांवर लावा आणि स्पंज ग्लिटरमध्ये बुडवून नखांना लावा. हे सुकल्यावर त्यावर अजून एक न्यूड कोट लावा आणि नखं फ्लाँट करा.

५) शार्प लुक नेल आर्ट (Sharp Look Nail Art)
हे डिझाईनही कूल दिसतं. हे लावणंही खूपच सोपं आहे. यासाठी तुम्ही कोणत्याही रंगाचं कॉम्बिनेशन करू शकता आणि कोणतंही फंकी डिझाईन काढू शकता.

६) ब्रशने पेटींग (Paint Brush Nail Art)
तसं तर नेल आर्टसाठी अनेक प्रकारचे ब्रश वापरले जातात. पण सर्वात जास्त सिंथेटिक ब्रिसलचा ब्रश चांगला मानला जातो. या ब्रशच्या साहाय्याने डिझाईनने एंगल्ड, लाईन, फ्लॅट, डॉटींग, डिटेल अशा डिझाईन्स बनवू शकता. या नेलआर्टने तुमची नखं खूप छान दिसतात.

७) स्पंज बॉबिंग (Sponge Bobbing)
जर तुम्हाला नखांवर ग्रेडीएंट आणि अक्रोमॅटीक डिझाईन हवं असेल तर तुम्ही स्पंज बॉब टेक्नीकचा वापर करू शकता. या टेक्नीकचा वापर करण्यासाठी बेस कोट लावून सुकल्यानंतर तसंच ठेवा. मग नेल पॉलीश लावून स्पंजचा वापर करून डिझाईन करा. नंतर नखाच्या आसपास लागलेलं नेलपेंट साफ करा.

७) स्टँम्पिंग (Stamping)
जर तुम्हाला सोप्या पद्धतीने नखांवर नेल आर्ट करायचं असेल तर वापर करा स्टँप्सचा. बाजारात अनेक डिझाईन्सचे नेल स्टँप्स मिळतात. त्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे नेल आर्ट डिझाईन्स नखांवर करू शकता. यासाठी सर्वात आधी चांगली नेल पॉलिश लावा आणि त्यावर स्टँप लेयर लावून कव्हर करा.

९) डिजीटल नेल आर्ट (Digital Nail Art)
हे नेल आर्ट नखांवर करून घेण्यासाठी तुम्हाला ब्युटी सॅलोन किंवा नेल आर्ट स्टुडिओमध्ये जावं लागेल. यासाठी एक खास मशीन वापरलं जातं ज्याच्या मदतीने डिजीटल प्रिंट तुमच्यावर नखांवर केलं जातं. फक्त हे नेल आर्ट थोडं महागडं आहे.

१०) एनिमल नेल आर्ट (Animal Nail Art)
आजकाल एनिमल प्रिंटही खूपच ट्रेंडमध्ये आहे आणि सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे लेपर्ड प्रिंट. या नेलआर्टसाठी खास ब्रशसुद्धा मिळतो. याशिवाय एनिमल प्रिंट डिझाईन्स स्टीकर्सही बाजारात मिळतात.

११) एक्वेरियल नेल आर्ट (Aquarium nail art)
जर तुम्हाला फिश किंवा एक्वेरियमची आवड असेल तर हे नेल आर्ट डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. एक्वेरियम नेल आर्ट डिझाईन नखांवर फारच सुंदर दिसतं. या डिझाईनमध्ये ब्लू क्रिस्टल्स खूपच सुंदर दिसतात. पाण्याचा आभास होण्याकरता न्यूड कलरचा वापर तुम्ही करू शकता. यानंतर कापूस किंवा स्पंजच्या साहाय्याने ग्लिटर लावू शकता.

१२) फ्लोरल नेल आर्ट (Floral nail art)
हा पॅटर्न खूपच सुंदर दिसतो. मॅनिक्युअर केल्यानंतर हे नेलआर्ट केल्यास खूपच छान दिसतं. या डिझाईनसाठी तुम्ही न्यूड नेलपेंट नखांवर लावून घ्या. एका पातळ ब्रशवर व्हाईट नेलपेंट घेऊन सुंदरसं फूल काढा. फूल काढून झाल्यावर फुलाच्या मध्यभागी पिवळ्या रंगाचा एक डॉट काढा. डिझाईन सुकल्यावर एक फायनल कोट लावा. 

१३) सँड नेल आर्ट (Sand Nail Art)
ज्या महिलांची नखं लांब असतात त्यांच्या नखांवर हे डिझाईन खूप छान दिसतं. हे डिझाईनला लावण्यासाठी तुम्ही मॅट नेलपेंट आणि ग्लिटरचा वापर करू शकता.

१४) एअरब्रश नेल आर्ट टेक्नीक (Airbrush Nail Art Technique)
एअरब्रश मशीन्सचा वापर आजकाल नखांना पेंट करण्यासाठीही केला जातो. सर्वात आधी नखांना बेस कोट लावून घ्या. मग तुमच्या आवडीच्या डिझाईननुसार स्टेन्सिल आणि स्टीकर नखांवर ठेवून एअरब्रशच्या साहाय्याने रंग भरा. मग स्टेन्सिल काढून नखाच्या आसपास लागलेला कलर एसीटोनने स्वच्छ करा.

१५) नेल आर्ट स्टिकर्स (Nail Art Stickers)
जर तुम्हाला घरच्या घरी कोणताही पसारा न करता नेल आर्ट करायचं असल्यास सोपा मार्ग म्हणजे बाजारात मिळणारे नेल आर्ट स्टिकर्स वापरून नखं सजवणं. यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही आणि हवं ते डिझाईन तुम्ही थेट नखांवर लावू शकता.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *