चीनच्या जॅक माला मागे टाकत मुकेश अंबानी आशिया खंडात सर्वात श्रीमंत व्यक्ति
फोर्ब्स मासिकाच्या नव्या, प्रख्यात जगातील अब्जाधीशांच्या यादीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान परत मिळवून गेल्यावर्षी प्रथम क्रमांकावर असलेल्या चीनच्या व्यवसायिक जॅक मा यांना मागे टाकले आहे.
मुकेश अंबानी भारतात आणि आशिया खंडात सर्वात श्रीमंत असून जागतिक यादीत १० व्या क्रमांकावर आहेत. एकूण ८४.५ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी मालमत्ता नोंदवत अंबानींनी हे स्थान मिळवले आहे.
“अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत , ते दहाव्या क्रमांकावर आहेत आणि अंदाजे ८४.५ अब्ज डॉलर्स एवढे त्यांचे नेट वर्थ आहे. गेल्यावर्षी आशियात सर्वात श्रीमंत असलेल्या जॅक मा यांच्या मालमत्तेत १० अब्ज डॉलर एवढी वाढ होऊन ही त्यांचा क्रमांक जागतिक यादीत २६ आला आहे जो गेल्यावर्षी १७ होता. या उलाढाली मुळेच अंबानींनी जॅक मा ला मागे टाकले आहे.”असे फोर्ब्स यांच्याकडून सांगण्यात आले.
या यादीत प्रथम क्रमांक सलग चौथ्यांदा ॲमेझॉन सी ई ओ जेफ बेझोस यांची मालमत्ता १७७ अमेरिकन डॉलर आहे यांनी पटकावला आहे. गेल्या एका वर्षात त्यांच्या मालमत्तेत ६४ अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली आहे. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर स्पेस एक्स चे इलॉन मस्क आहेत. मस्क यांची मालमत्ता १५१ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी १२६.४ अब्ज गेल्या एका वर्षात कमावलेले आहेत.
“इलॉन मस्क मागच्या वर्षी ३१ व्या क्रमांकावर होते तर यावर्षी थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत याचे मूळ कारण म्हणजे टेस्ला च्या शेअर मध्ये झालेली ७०५ टक्क्यांची वाढ” असे फोर्ब्सने ससांगितले.
याव्यतिरिक्त अडाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अडानी भारतात दुसरे सर्वात श्रीमंत तर जगात २४ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ५०.५ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी आहे