एसटी महामंडळाने कॅनकिड्स किड्सकॅन (CANKIDS KIDSCAN) या स्वयंसेवी संस्थेच्या बालकर्करोगविरोधी जनजागृती अभियानात सहभाग नोंदवला आहे . या संस्थेस महामंडळाच्या बसेसवर निःशुल्क जनजागृतीचे फलक लावून सहकार्य केले आहे . या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात संबंधित संस्थेने राबविलेल्या बालकर्करोगविरोधी जनजागृती मोहिमेबाबत एसटी महामंडळाने पुढाकार घेतलेला आहे. कॅनकिड्स किड्सकॅन हि संस्था संपूर्ण भारतामध्ये बालकर्करोगविरोधी जनजागृतीचे कार्य करीत आहे. यांच्या कार्याला विधायक हातभार लावण्याच्या उद्देशाने एसटीच्या मागील बाजूस बालकर्करोगविरोधी अभियानाचे कापडी फलक निःशुल्क लावण्याचे व त्याद्वारे सर्वसामान्यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एसटी महामंडळाने संबंधित संस्थेस सहकार्य केले आहे. यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमामध्ये एसटीने आपला थेट सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेली एसटी सकारात्मक सामाजिक बदलांमध्ये कृतिशील सहभाग नोंदवत असून त्यातून जनमानसात आपली प्रतिमा उज्वल करण्याचा प्रयत्न एसटीद्वारे करीत आहे