15व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत प्रिशा शिंदेचा जान्हवी काजलावर विजय
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्यातर्फे आयोजित १५ व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल १२ वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित प्रिशा शिंदे हिने राजस्थानच्या चौथ्या मानांकित जान्हवी काजलाचा 6-4, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आयुश पुजारी याने आपली विजयी मालिका कायम ठेवत उत्तरप्रदेशच्या अनुज सरडाचा 6-2, 7-5 असा पराभव करून आगेकूच केली.
दिल्लीच्या तिसऱ्या मानांकित ओजस मेहलावट याने महाराष्ट्राच्या ओम वर्माचा 6-2, 6-1 असा तर, हरियाणाच्या दुसऱ्या मानांकित आरव चावलाने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या शिवतेज शिरफ़ुलेचा 6-4, 6-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
महाराष्ट्राच्या चौदाव्या मानांकित अमोघ दामले याने उत्तरप्रदेशच्या सानिध्य व्दिवेदीचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(2) असा पराभव केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मेहक कपूर हिने शान्विथा नुकालाचे आव्हान 6-1, 6-1 असे संपुष्टात आणले. तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या हरिथाश्री वेंकटेश हिने आपली राज्य सहकारी जीडी मेघनाचा 6-4, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:
आयुश पुजारी(महाराष्ट्र)वि.वि.अनुज सरडा(उत्तरप्रदेश)6-2, 7-5
ओजस मेहलावट(दिल्ली)(3) वि.वि.ओम वर्मा(महाराष्ट्र)6-2, 6-1
आरव चावला(हरियाणा)(2) वि.वि.शिवतेज शिरफ़ुले(महाराष्ट्र)6-4, 6-0
अमोघ दामले(महाराष्ट्र)(14) वि.वि. सानिध्य व्दिवेदी(उत्तरप्रदेश)6-3, 7-6(2)
मुली:
मेहक कपूर(महाराष्ट्र)वि.वि.शान्विथा नुकाला 6-1, 6-1
हरिथाश्री वेंकटेश(कर्नाटक)(3)वि.वि.जीडी मेघना(कर्नाटक)6-4, 6-3
प्रिशा शिंदे(महाराष्ट्र)(5) वि.वि.जान्हवी काजला(राजस्थान)(4)6-4, 6-1
माया राजेश्वरन(तामिळनाडू)(2) वि.वि.स्निग्धा कांता(कर्नाटक)(6) 6-1, 6-2.
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुली :
हरिथाश्री वेकंटेश/माया राजेश्वरन वि.वि.अहाना/सना वर्धमानी 6-0, 6-1
स्निग्धा कांता/जीडी मेघना वि.वि.खुशी गौर/नंदिनी कंसल 6-1, 6-1
ह्रितिका कपले/आराध्या वर्मा वि.वि.शान्विथा नुकाला/मृणाल शेळके 7-6(1), 2-6, 10-2
मुले: ओजस मेहलावत/आरव चावला(1) वि.वि.मनन अगरवाल/आयुष पुजारी 6-0, 6-4
श्लोक चौहान/देव पटेल वि.वि.अद्वित तिवारी/अम्रित वत्स 6-1, 6-1
द्रोण सुरेश/तविश पाहवा(4) वि.वि.नील केळकर/ओम वर्मा 4-6, 6-3, 10-6
प्रतिक शेरॉन/रुद्र बाथम(2) वि.वि.प्रकाश सुरेश/फझल अली मीर 6-2, 5-7, 10-4.