लाइफस्टाइल

मोबाईलच्या आहारी जाताय ?

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. ऑनलाईन शाळा, ऑफिसची कामे किंवा मनोरंजन प्रत्येक गोष्टीसाठी आपण मोबाइलचा वापर करतो. एका संशोधनानुसार प्रत्येक व्यक्ती दिवसाला सुमारे २,६१७ वेळा मोबाईलच्या स्क्रीनला स्पर्श करतो. तरुण मंडळी मोबाइलचा अधिक वापर करतात त्यामुळे संवाद साधण्याची सवय नाहीशी होणे, नकारात्मकता, लठ्ठपणा, अभ्यासात लक्ष न लागणे यांसारख्या अनेक परिणामांना हे लोक सामोरे जात आहेत. अनेक लोक या मोबाईलच्या व्यसनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्यांना योग्य मार्ग सापडत नाही. त्यासाठी खालील काही उपायांचा तुम्ही प्रयोग करू शकता. 
१. आठवड्यातील एक दिवस ठरवा : मोबाईलची सवय कमी करण्यासाठी अनेक लोक हा पर्याय वापरतात. प्रत्येक आठवड्यातील कोणताही एक दिवस निवडा.( सुट्टीचा दिवस असेल तर अधिक उत्तम) त्या दिवशी मोबाइलचा वापर करणे टाळा. यामुळे तुम्हाला मोबाईलपासून दूर राहण्याची सवय लागेल. 
२. ३० दिवस प्रयोग करून बघा : मोबाईलची सवय कमी करायची असेल तर ३० दिवसांसाठी केवळ महत्त्वाचे फोन आणि संदेश सोडले तर इतर ॲप बंद करा. यामुळे तुम्ही बाकीच्या ॲप्समध्ये अकारण घालवत असलेला वेळ वाचून आपसूकच तुमच्या हातून इतर चांगली कामे होतील. 
३. ॲप्सचा वापर करा : स्वतः वर नियंत्रण मिळवण्यासाठी इंटरनेटवर स्क्रीन टाईम, मोमेंट, स्पेस यांसारखे काही उत्तम ॲप्स तुम्हाला उपलब्ध होतील. त्यांचा वापर करून तुम्ही मोबाईल वापरण्याचा वेळ नियंत्रित करू शकता. 
४. घरात प्रवेश केल्यानंतर फोन वापरणे टाळा : तुम्ही  महाविद्यालयात शिक्षण घेत असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल तर काम संपवून घरी परतल्यानंतर तुम्ही तुमचा फोन ड्रॉवरमध्ये किंवा कपाटात ठेवा. यामुळे तुम्ही घरातील लोकांना वेळ देऊ शकाल आणि मोबाईल पासून दूर राहण्यास मदत होईल.
५. मोबाईलच्या सेटिंगमध्ये बदल करा : तुमच्या मोबाईलमधील नोटीफिकेशन बंद करा, ब्लॅक अँड व्हाईट मोड सुरू करा, तुमचे लक्ष विचलित करणारे ॲप्स मुख्य स्क्रीन वरून काढा, मोठा पासवर्ड ठेवा, ‘एरोप्लेन मोड किंवा डू नॉट डिस्टर्ब चा वापर करा.’ अशा पद्धतीची सेटिंग तुम्हाला मोबाईलच्या सवयीपासून मुक्त होण्यास मदत करेल.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *