उन्हाळ्यातील रामबाण पेय;कैरीचं पन्हं
कैरीचं पन्हं उन्हाळ्यासाठी अतिशय गुणकारी असते. कैरीचं पन्हं हे एक भारतीय पेय आहे जे उष्णता-प्रतिरोधक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे.
हे कच्च्या आंब्यापासून बनविले जाते आणि भारतीय उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेविरुद्ध लढा देण्यासाठी चवदार आणि निरोगी पेय म्हणून वापरले जाते.
पाककृती:
१. कैर्या किमान ४ तास आधी थंड पाण्यात बुडवून ठेवाव्यात. याने चिक असेल, तर संपूर्ण निघून जातो.
२. पाण्यातून काढून, निथळून कूकरमध्ये सर्वात वर एखाद्या झाकणावर आख्ख्या कैर्या (देठ न काढता) ठेवाव्यात आणि शिजवाव्यात.
जास्त शिट्ट्या लागत नाहीत. ३ शिट्ट्या आणि २ मिनिट बारीक गॅस पुरेल.
३. गार झाल्या की कैरीचा गर काढून घ्यावा.
४. जेवढा गर त्याच्या दुप्पट साखर/ गूळ/ दोन्ही समप्रमाणात कैरीच्या गरात मिसळावे.
थोडेसे चवीला मीठ घालावे, वेलदोड्याची पूड घालावी. हवं असल्यास केशराच्या काड्याही एकत्र कराव्यात.
५. हे टिकवायचं असल्यास, मिश्रण गॅसवर ठेवून एकच चटका द्यावा. हे साखरांबा म्हणून नुसते पोळीबरोबरही मस्त लागते.
६. अन्यथा, ग्लासमध्ये २ चमचे हे मिश्रण घालून, पाणी घालायचं, ढवळायचं.. पन्हं तयार.
अधिक टिपा:
१. पन्हं करण्यासाठी लागणारा वेळ, गर काढण्यापासूनचा आहे. कैरी पाण्यात बुडवून ठेवलेला वेळ, कूकरचा वेळ धरलेला नाही.
२. पन्ह्यासाठी कैरी हिरवीगार आणि टणक हवी.
३. कैरीला शिरा असल्यास, गर काढल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्यावा.
४. तोतापुरी कैरीही चालेल, ती जरा गोडसर असते. पण पारंपारिक कैरीच्या पन्ह्याची चव आगळीच.
५. शक्यतो पन्ह्यात गूळ घालावा, साखरेऐवजी. गुळाची चव जास्त खमंग लागते. अर्थात, हे आवडीवर अवलंबून आहे.
कैरीचे पन्हे पिण्याचे फायदे:-
उन्हाळ्याचे दिवस आता सुरू झालेले आहेत वातावरण तापू लागलेय या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही कैरीचे पन्हे सेवन करून शकतात.
जाणून घेऊयात कैरीचे पन्हे पिण्याचे आरोग्यदायी फायदे सगळ्यात पहिले जाणून घेऊयात कैरीचे पन्हे बनवण्याची सोपी पद्धत.
हे सर्व एकजीव झालं की चवीनुसार मीठ टाकून आवश्यक तेवढं पाणी टाकून ढवळून घ्या. पन्हं आपलेपणाने तयार होईल.
आता जाणून घ्या कैरीच्या पन्ह्याचे आरोग्यदायी फायदे : पन्हे शरीरला थंड ठेवण्याचे कार्य करते.
यासह ते गरम हवामान शरीरात आवश्यक इलेक्ट्रोलाईट देखील प्रदान करते.
जर आपण उन्हाळ्याच्या दुपारी एक ग्लास कैरीच्या पन्ह्याचे सेवन केले तर त्यामुळे आपल्याला थकवा दूर होण्यास मदत मिळते.
कैरी पन्ह्यात कार्बोहाइड्रेट , व्हीटॅमिन ए, व्हीटॅमिन बी १, बी२, व्हीटॅमिन सी असे शरीराला आवश्यक घटक असतात.
याबरोबरच यात लोह, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शियम यासारखे खनिज पदार्थ देखील असतात.
शहरात व्हीटॅमिन-सी नसल्यामुळे स्कर्वीची समस्या उद्भवते. स्कर्वीमुळे हिरड्यांचे आजार आणि अशक्तपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात.
पण कैरीच्या पन्ह्याचे सेवन केले तर तुम्हाला स्कर्वी समस्यांपासून मुक्तता मिळते.
गर्भवती महिलांसाठी कैरीच्या पन्ह्याचे आढळणारे फोलेट गर्भाच्या जन्माच्या दोषांच्या विविध धोक्यांपासून संरक्षण करते.
इतकेच नाही तर मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी फुले देखील आवश्यक घटक असतो.
कैरीचे पाण्यात असणारे अँटीऑक्सीडेंस व्हीटॅमिन सी आपल्याला रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
नियमित कैरीच्या पन्ह्याचे सेवन केल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढते. उन्हाळ्याच्या हंगामात पचनाच्या समस्या वाढू लागतात.
कैरीच्या पन्ह्याचे सेवन केल्यास अपचन, अतिसार आणि मुळव्याध सारख्या समस्या टाळण्यास मदत होते.