मोदी शहाच्या वेळेनुसार वेळापत्रक ठरलंय का ? दिदीचा निवडणूक आयोगावर आरोप
निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहे. एका जिल्हात तीन टप्प्यात मतदान का असा प्रश्न ममता यांनी उपस्थित केला आहे .आठ टप्प्यांत मतदानाची घोषणा म्हणजे निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यांना मोदी-शहा यांना प्रचारासाठी वेळ भेटावा म्हणून त्यांनी तारखा भाजपच्या अनुसार जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्न विचारला की एका जिल्ह्यात तीन टप्प्यात निवडणुका का घेतल्या जातात.