औरंगाबाद अंशतः बंद,तर शनिवार व रविवार कडकडीत बंद
औरंगाबाद शहरात दि.११ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू राहील व शनिवार व रविवार संपूर्ण शहर लॉकडाऊन राहणार
- दि. ११ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे तसेच परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.
नियम न पाळल्यास नाईलाजाने पुर्णतः लॉकडाऊन करावे लागेल असे प्रशासनाचे सांगितले.
आठवड्यातील प्रत्येक शनिवारी व रविवारी पुर्ण लॉकडाऊन असेल.
- यावेळी वैद्यकीय, मीडिया, बँक, पशुखाद्य, अंडी, दूध, भाजीपाला, गॅस, पेट्रोल पंप, उद्योग, मटण, वाहतूक, औद्योगिक परिसर, इत्यादी सुविधा शनिवारी व रविवारी पण सुरु राहतील.
या दरम्यान धार्मिक, राजकीय, आंदोलने, मोर्चे कार्यक्रम यावर पुर्णतः बंदी असेल.
तसेच शहरातील आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस, बंद राहतील मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील तसेच नियोजित परीक्षा घेण्यात येईल.
शहरातील मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल मधील लग्न समारंभास पुर्णतः बंदी असेल.
शहरातील हॉटेल, बार, परमिट रूम, बार आदी रात्री ९ पर्यंतच ५० टक्के क्षमतेने, सुरु राहतील. तसेच होम डिलिव्हरी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.
सर्व व्यापाऱ्यांना दर १५ दिवसांनी RTPCR बंधनकारक असेल. त्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.
जाधववाडी व सर्व मार्ट/मॉल बंद, बुधवार रात्री पासून ७ दिवस बंद राहील.
खासगी कार्यालय व सरकारी कार्यालये मात्र सुरू राहतील.
आता नियम पाळले तर छोट्या लॉकडाऊन मध्येच भागेल नसता मोठ्या लॉकडाऊनकडे वाटचाल करावी लागेल. सर्व विभाग सोबत काम करून कोविड ला नक्कीच थांबवू
तसेच कोविड लस सर्वांनी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या…