सी-व्होटर : केरळ मध्ये पुन्हा एलडीएफची सत्ता येणार?
निवडणूक आयोगाने तामिळनाडू, केरळ , पश्चिम बंगाल , आसाम व पॉंडिचेरी या पाच राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असूूून या राज्यांपैकी महत्त्वाची तीन राज्य म्हणजे तामिळनाडू, केरळ व पश्चिम बंगाल.
कारण या तिन्ही राज्यांमध्ये स्थानिक पक्षांची सत्ता आहे व भारतीय जनता पक्षाला इथे अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही .अशा कारणांमुळेच येथील निवडणुका ह्या महत्त्वाच्या ठरणार आहेत .
केरळ मध्ये सध्या कोणाची सत्ता ?
केरळ मध्ये LDF ची सत्ता आहे आहे . LDF मध्ये CPI व CPI(M) हे दोन महत्त्वाचे पक्ष आहेत . CPI(M) चे पिनर्यी विजयान हे केरळचे मुख्यमंत्री आहेत .तर विरोधी पक्षांमध्ये UDF म्हणजेच UNITED DEMOCRATIC FRONT आहे .UDF मध्ये काँग्रेस व Indian United Muslim League ( IUML ) हे पक्ष आहेत.
LDF पुन्हा केरळ मध्ये सत्ता स्थापन करणार – C-Voter
C-Voter ने 24 मार्चला चार राज्य व एका केंद्रशासित प्रदेशात केलेल्या सर्वेचा निकाल जाहीर केला . यामध्ये CPI(M) आणि CPM हे मुख्य पक्ष असलेला LDF पुन्हा केरळच्या सत्तेमध्ये येईल असे C-Voter च्या सर्वे मध्ये समोर आले . या सर्वेमध्ये विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसला फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे . केरळ मध्ये झालेल्या या सर्वे मध्ये 12,077 एवढ्या लोकांचे मत विचारात घेतले आहे .
C- Voter सर्वेचा केरळमधील सविस्तर आढावा
2016 मध्ये 91 जागा जिंकलेल्या LDF ला यावर्षी 14 जागा कमी मिळण्याची शक्यता आहे . असे झाल्यास LDF हे 77 जागांवर निवडून येऊ शकते .तरीसुद्धा 140 जागा असलेल्या केरळ मध्ये LDF पुन्हा 2021 मध्ये सत्तेवर येऊ शकते .
UDF एवढे जरी सत्ता स्थापन करू शकलं नसलं तरी 2016 च्या निवडणुकीपेक्षा यावर्षी UDF 15 जागा शिल्लक जिंकण्याचा अंदाज आहे .2016 ला UDF ला 47 जागा मिळाल्या होत्या यावर्षी UDF एकूण 61 जागा सुद्धा मिळू शकते .
साबरीमला महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करून सुद्धा भारतीय जनता पक्ष अपेक्षित अशी कामगिरी या वर्षी सुद्धा केरळमध्ये करू शकनार नाही असा अंदाज आहे .भारतीय जनता पक्षाला परत संतुष्ट व्हावा लागेल एकाच जागेवर संतुष्ट व्हाव लागेल .
LDF ही 71 ते 83 दरम्यान जागा जिंकू शकते तर UDF ही 56 ते 68 जागा जिंकू शकते.
केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांना 39.3 % लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार ठरवल आहे .
LDF चा Vote Share हा 2016 च्या तुलनेत 1.1% घसरू शकतो . LDF चा 2016 मध्ये 43.4 Vote share होता तो आता 42.4 एवढा होण्याची शक्यता आहे .
UDF चा Vote Share सुद्धा 2016 च्या तुलनेत 0.2 टक्के कमी राहण्याचा अंदाज आहे. 2016 मध्ये UDF चा Vote Share हा 38.8 टक्के होता तो 38.6 पर्यंत राहणार आहे