15000डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीतच खळबळजनक विजय
फैजल कुमार, इशाक इकबाल, पारस दहिया, सूरज प्रबोध यांचे सनसनाटी विजय
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित 15000डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत फैजल कुमार, इशाक इकबाल पारस दहिया, सुरज आर प्रबोध रणजीत विराली-मुरुगुसेन या भारतीय खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत भारताच्या दहाव्या मानांकित फैजल कुमार याने अव्वल मानांकित अनिरुद्ध चंद्रसेखरचा 6-4, 3-6, 17-15 असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. इशाक इकबाल याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवता नवव्या मानांकित चंद्रिल सूदचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. बाराव्या मानांकित पारस दहिया याने पाचव्या मानांकित रोमानियाच्या जॉर्ज बोटझेनचा 6-2, 6-3 असा तर, तेराव्या मानांकित रणजीत विराली-मुरुगुसेन याने सहाव्या मानांकित ऋषी रेड्डीचा 7-5, 2-6, 10-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली. सातव्या मानांकित भारताच्या एन. विजय सुंदर प्रशांत याने अमेरिकेच्या पंधराव्या मानांकित प्रेस्टन ब्राऊनचे आव्हान 6-2, 6-1 असे संपुष्ठात आणले. अकराव्या मानांकित सूरज आर प्रबोध याने आठव्या मानांकित मुतु आदीथ्य सेंथीलकुमारवर 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी:
पुरुष गट:
फैजल कुमार(भारत)[10]वि.वि.अनिरुद्ध चंद्रसेखर(भारत) [1] 6-4, 3-6, 17-15;
इशाक इकबाल(भारत)वि.वि.चंद्रिल सूद(भारत) [9] 6-3, 6-2;
ओमनी कुमार(यूएसए)[3] वि.वि.दिग्विजय प्रताप सिंग(भारत) [14] 7-6(1), 7-5;
हेनरी पॅटन(ग्रेट ब्रिटन) [4] वि.वि. लिओनार्ड कॅटनी(इटली)[16] 6-2, 6-4;
पारस दहिया(भारत)[12]वि.वि.जॉर्ज बोटझेन(रोमानिया)[5] 6-2, 6-3;
रणजीत विराली-मुरुगुसेन(भारत)[13]वि.वि.ऋषी रेड्डी(भारत)[6] 7-5, 2-6, 10-4;
एन. विजय सुंदर प्रशांत(भारत) [7]वि.वि.प्रेस्टन ब्राऊन(यूएसए)[15] 6-2, 6-1;
सूरज आर प्रबोध(भारत)[11]वि.वि.मुतु आदीथ्य सेंथीलकुमार(भारत)[8] 6-2, 6-2;