किशोरी अमोणकर यांना ’गानसरस्वती” या उपाधीने ओळखले जाते.
किशोरी आमोणकर : (१० एप्रिल १९३१ – ३ एप्रिल २०१७). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या एक श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न गायिका. त्यांच्या जन्म मुंबई येथे झाला. जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर व माधवदास भाटिया यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. किशोरीताईंचे शालेय शिक्षण मुंबई येथील बालमोहन व प्रार्थना समाज या शाळांमध्ये झाले. त्यानंतर जयहिंद महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या तालेवार गायिका होत्या. आईकडूनच संगीताचं ज्ञान घेतलेल्या किशोरी आमोणकर यांनी पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. किशोरीताईंनी त्यांच्या आई शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतलं. किशोरी आमोणकर या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. गायन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या किशोरी आमोणकर यांना ‘गानसरस्वती’ असं म्हटलं जातं. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसंच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे. किशोरीताईंनी 1950च्या दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. किशोरीताईंनी 1964 साली ‘गीत गाया पत्थरोंने’ या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं. 1990 मध्ये प्रसारित झालेल्या ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या गीत गाया पत्थरों ने या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. मुंबईतल्या एलफिन्स्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताई मुळात डॉक्टर व्हायचे होते. पंरतु मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहुन घेतले. जाईन विचारीत रानफुला हे मराठीतील त्यांचे गीतही स्वशिल्पाचा नमुना ठरला. 1987 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने तर 2002 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवले. शास्त्रीय मोलाची कामगिरी बजावताना त्यांनी शिष्यांची फौज तयार केली. माणिक भिंडे ,नंदिनीई बेडेकर, आरती अंकलीकर- टिकेकर, देवकी पंडित आणि रघूनंदन पणशीकर हे त्यातील काही महत्वाची शिष्यगण. नात तेजश्री हिच्या विवाह समारंभात गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे अखेरचे दर्शन घडले होते. तेजश्री ही त्यांच्या गायिकाचा वारसा जपत आहे. त्यांच्या जाण्याने केवळ जयपूरच्या घराचाच नव्हे तर संपूर्ण संगीताच्या जगाचा सर्वात मोठा तोटा झाला आहे, जे आतापर्यंत कोणीही पूर्ण करू शकणार नाही.