श्रीदेवीनंतर मीच! या ट्विटनंतर कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे चर्चेत आलेली बॉलीवूड क्वीन एका ट्विटमूळे ट्रोल होतीय. काही दिवसांपूर्वी तिने स्वतःची तुलना टॉम कृजसोबत आणि हॉलिवूड अभिनेत्री मिरेल स्ट्रीपसोबतही केली होती. त्यामुळे तिला “खुद के मूह मिया मिट्टू” असे संबोधले जाते आहे.
तनु वेड्स मनू या सिनेमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कंगनाने एक ट्विट केले त्यात ती असं म्हणत आहे की “करिअरच्या सुरुवातीस मी अतिशय निरुत्साही आणि विक्षिप्त भूमिका साकारल्या आहेत, मात्र या सिनेमामुळे माझा करिअरची दिशा बदलली. या सिनेमातील कॉमेडीमुळे मला मुख्य प्रवाहात एन्ट्री मिळाली. दत्तो आणि क्वीनने माझ्या कॉमिक टायमिंगला वेगळ्या उंचीवर नेले आणि श्रीदेवी यांच्यानंतर मी कॉमेडी करणारी एकमेव अभिनेत्री ठरेल”. या सिनेमासाठी आनंद एल राय आणि लेखक हिमांशू शर्मा यांचे तिने आभार मानले आहे. तिने असेही म्हटले की, “ते दोघे जेव्हा माझ्याकडे या चित्रपटाची स्टोरी घेऊन आले तेव्हा तिला असे वाटले की, ती त्या दोघांचे करिअर बनवू शकेल परंतू त्यांनीच माझे करिअर बनवले”. कोणता चित्रपट हिट होईल कोणता नाही हे सगळं कोणालाच माहिती नसते, हा सगळा नशिबाचा खेळ आहे, असे तिने दुसऱ्या ट्विट मध्ये लिहिले.