इकॉनॉमीदेश-विदेश

स्नॅपडिल, मिंत्राची मालकी असलेल्या कलारी कॅपिटल मध्ये जिओ गुंतवणार २०० दशलक्ष डॉलर!

रिलायन्स उद्योगसमूहाचे दूरसंचार प्लॅटफॉर्म असलेले जीओ लवकरच स्नॅपडिल, मिंत्रा,अर्बन ल्याडर सारख्या प्रसिद्ध ई- कॉमर्स स्टार्टअपची मालकी असलेल्या कलारी कॅपिटल मध्ये २०० दशलक्ष डॉलरची भरघोस गुंतवणूक करणार आहे.भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी रिकियन्सने ही गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे कलारी कॅपिटल 

 वाणी कोला यांची कलारी कॅपिटल विविध स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून त्यांना वाढायला मदत करते. स्नॅपडिल, अर्बन ल्याडर, मिंत्रा आणि ड्रीम ११ सारख्या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्ममध्ये कलारीने मोठी भागीदारी मिळवली आहे.याअगोदर कलारिने २०१५ मध्ये २९० दशलक्ष डॉलरचे निधी संकलन केले होते जे आतापर्यंतची कंपनीतील सर्वाधिक गुंतवणूक आहे. कलारी आता चौथ्यांदा निधी संकलनासाठी जुटली आहे. व्यापाराचा विस्तार हा प्रमुख हेतू असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. रिलायन्सच्या मोठ्या गुंतवणुकीने कलारीला मुबलक आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

गुंतवणुकीमागे रीलायन्सचा हेतू 

                     दूरसंचार हेच भविष्यातील इंधन असल्याचे सांगणारे मुकेश अंबानी यांची रिलायन्स जियो भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. मुकेश अंबानी यांच्या दूरदृष्टीने जियो ने व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण केली आहे यात शंका नाही. आता अंबानी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात रीलायन्सचा पाय रुजविण्याचे प्रयत्न करतांना दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी तेल उद्योगाला स्वतंत्र करून आता पूर्ण शक्ती दूरसंचार आणि तंत्रज्ञानात लावणार असल्याचे संकेत दिले आहे. जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स असलेल्या अमेझॉन ला भारतात स्नॅपडिल, मिंत्रा कडून  जोरदार टक्कर दिली जाते, त्यामुळेच कलारिला मजबूत करून भारतीय ई कॉमर्स व्यवसायात रीलायन्स नाव करू पाहत आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *