कोरोना पासून वाचायचं ? तर नियमित करा ‘जलनेती’….
गेल्या एका वर्षापासून आपण सर्वजणच कोरोना नामी रोगाला त्रस्त झालेले आहोत. कोरोना(covid19) हा संसर्गजन्य आजार आहे. कोरोना विषाणू नाक, घशात मुक्काम करतो. त्यात वाढ झाल्यानंतर विषाणू शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो.
जलनेतीची पद्धत
१.नेती पात्रात पाणी घेऊन मान थोडी उजव्या बाजूला वळवून उजव्या नाकपुडीने श्वास घेत नेती पात्रातले पाणी हळू हळू उजव्या नाकपुडीत सोडावे.
२. जलनेती करताना तोंडावाटे शरीरात हवा घ्यावी. पाणी डाव्या नाकपुडीतून आपोआप बाहेर पडेल.
३. त्यानंतर मान डाव्या बाजूला वळवून डाव्या नाकपुडीने श्वास घेताना नेती पात्रातले पाणी हळू हळू डाव्या नाकपुडीत सोडावे. ही प्रक्रिया करताना तोंडावाटे शरीरात हवा घ्यावी. पाणी उजव्या नाकपुडीतून आपोआप बाहेर पडेल.
जलनेतीचे फायदे
१.सर्दी असो वा नसो जलनेती नियमित करणे उपयुक्त ठरते.
२.जलनेती केल्याने नाकपुड्या स्वच्छ ठेवण्यात उपयुक्त आहे.
३.नाकाशी संबंधित अनेक विकारांवर मात करण्यासाठी जलनेती लाभदायी आहे.
४. कानाशी संबंधित काही विकारांवरही जलनेती लाभदायी ठरते.
५.जलनेती केल्यानंतर कपालभाती करणे लाभदायक आहे.