मोटेरावर इशांत रचणार इतिहास.
100 टेस्ट खेळणारा दुसरा वेगवान गोलंदाज बनणार.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात होणार आहे. यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मैदानावर उतरताच आपली 100 वी कसोटी खेळून मोटेरावर इतिहास रचणार आहे. इशांतने आपल्या कसोटी करिअरची सुरुवात 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध केली होती. भारतासाठी कपिलदेव नंतर सर्वाधिक कसोटी खेळणारा इशांत हा भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच आपल्या 100 कसोटी पूर्ण करण्याची संधी इशांतकडे होती, मात्र गत वर्षीच्या आयपएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे ही संधी त्याला गमवावी लागली. इशांत शर्माने आतापर्यंत 99 कसोटी खेळल्या असून, त्याने 32.22 च्या सरासरीने 302 विकेट मिळवल्या आहेत. स्वदेशात 39कसोटी सामन्यात 103 तर भारताबाहेर 60 कसोटीत त्याने 199 बळी घेतले. मायदेशातील त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन 78 धावा आणि 9 विकेट तर, विदेशात 108 धावा 10 विकेट आहे.
दिल्लीच्या या वेगवान गोलंदाजाने सर्वात जास्त विकेट ऑस्ट्रेलियावरुद्ध पटकावले आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया विरूध्द 25 सामन्यात 59 बळी घेतले. याव्यिरिक्त इंग्लंड विरूध्द 19 कसोटीत 61, दक्षिण आफ्रिकेविरुध्द 15 कसोटीत 31 वेस्ट इंडिजविरुद्ध 12 कसोटीत 46 गडी बाद केले आहेत.
याबरोबरच त्याने श्रीलंका विरूध्द 12 सामन्यात 36, न्यूीलंडविरुद्धच्या सात सामन्यात 35 , बांगलादेशविरुद्ध सात कसोटीत 25 , पाकिस्तान विरूध्द एका सामन्यात पाच आणि अफगाणिस्तान विरूध्द एका सामन्यात चार विकेट पटकावले आहेत.नेहमी याच एका फॉरमॅट मध्ये खेळल्याने जलद 100 कसोटी सामने पूर्ण करणे शक्य झाल्याचे इशांतने सांगितले.