स्पोर्ट्स

पदार्पण सामन्यात ईशान किशन चमकला; भारताचा ७ विकेट्सनी विजय

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ विकेट्सनी विजय मिळवला आहे. तत्पुर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारताने २ बदल केले असून शिखर धवन व अक्षर पटेलच्या जागी ईशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंडने देखील एक बदल केला. मार्क वूडच्या जागी टॉम करनला खेळवले.भारताची सुरुवात शानदार झाली. पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने बटलरला बाद केले. परंतु जेसन रॉय आणि डेविड मलानन परिस्थिती सांभाळली. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक ३५ चेंडूत ४६ धावा केल्या. ह्यात त्यात २ षटकार व ४ चौकार मारले. भारताकडून सुंदर व शार्दूल नी प्रत्येकी २-२ बळी घेतले. इंग्लडने भारताला १६५ धावांचे लक्ष्य दिले.लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामी फलंदाज के एल राहुल शुन्यावरच बाद झाला.यानंतर कर्णधार कोहली व युवा ईशानने परिस्थिती सांभाळली. आपल्या पदार्पणातच ईशान किशनने ताबडतोड ३२ चेंडूत ५६ धावा केल्यात त्यात ४ गगनचुंबी षटकार व ५ चौकाराचा समावेश आहे. कर्णधार कोहली नी ४९ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या. यात ३ षटकार आणि ५ चौकाराचा समावेश होता. इंग्लंड कडून सॅम करण,क्रिस जॉर्डन,आदिल रशीद नी प्रत्येकी १-१-१ गडी बाद केले. पदार्पण सामन्यात जबरदस्तअर्धशतक ठोकलेल्या ईशानला सामनावीर घोषित करण्यात आले.

कोण आहे ईशान किशन?

इशान किशन हा रणजी चषकामध्ये झारखंडकडून खेळणारा भारतीय क्रिकेटपटू आहे. मार्च २०२१ मध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

२०१६ मध्ये होणा-या अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी डिसेंबर २०१५ मध्ये त्याला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. किशन हा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. २०१८ आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सने इशान ला ६.२ करोड रुपयामध्ये विकत घेतले होते. मुंबई इंडियन्ससाठी यष्टिरक्षक म्हणून पण त्याने उत्तम कामगिरी बजावली आहे. २०१८ च्या आयपीएलमध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये २७५ धावा केल्या आहेत.
६ नोव्हेंबर २०१६ रोजी, इशान किशनने दिल्ली विरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत २७३ धावा केल्या. रणजी करंडकातील झारखंडकडून एका खेळाडूने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. २०१७-१८ रणजी करंडक मध्ये त्याने सहा सामन्यात ४८४ धावा केल्यात. २० फेब्रुवारी २०२१ रोजी, २०२०-२१ विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी किशनने मध्य प्रदेश विरुद्ध १७३ धावा केल्या. झारखंडने आपला डाव ४२२/९ वर पूर्ण केला, ही विजय हजारे ट्रॉफीमधील कोणत्याही संघामधील सर्वोच्च धावसंख्या होती. त्याच दिवशी, त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या टी -२० आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले. भारत क्रिकेट संघामध्ये हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय कॉल-अप होता.त्याने इंग्लंड विरुद्ध १४ मार्च २०२१ रोजी टी -२० मध्ये पदार्पण केले, आपल्या ह्याच पदार्पण सामन्यात ईशान ने ताबडतोड ५६ धावा साकारल्या आहेत. ईशान ने आयपीएल मध्ये ५१ सामन्यात १२११ धावा केल्या आहेत. ह्यात त्याने १०० चौकार व ६४ षटकार मारले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३६.८४ चा असतो.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *