रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा मुंबई इंडियन्सवर २ विकेट्सनी विजय
२०१३ पासून पहिला सामना हारण्याची मुंबईची परंपरा कायम
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सने विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरुने 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. टॉस जिंकून विराट कोहली ने गोलंदाजी चा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. मुंबईकडून ख्रिस लिनने सर्वाधिक 49 धावा केल्या.कर्णधार रोहित शर्मा रन आऊट झाला. स्ट्राईकवर असलेल्या ख्रिस लिनच्या चुकीच्या कॉलमुळे रोहित शर्मा रन आऊट झाला. सुर्यकुमार यादव ने देखील 31 धावा केल्या तर बंगळुरूकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. लक्षचा पाठलाख करतांना 46 धावांवर दुसरी विकेट गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहली (30) आणि ग्लेन मॅक्सवेलने (26) आरसीबीचा डाव सावरला. या सामन्यात शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर एबी डिव्हिलियर्स धावबाद झाल्याने सामना आरसीबीच्या हातून निसटेल असं वाटत होतं. परंतु गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेलने शेवटची धाव घेत सामना जिंकण्यात मोलाची भूमिका निभावली. हर्षलने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 27 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. विशेष म्हणजे 5 पैकी 3 विकेट्स त्याने सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये घेतल्या. हर्षल आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कारना सन्मानित करण्यात आले.