चेन्नईचा राजस्थानवर ४५ धावांनी मोठा विजय
राजस्थानने यावेळी नाणेफेक जिंकली आणि चेन्नईच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी त्यांनी पाचारण केले. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर राजस्थानला चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद करण्याची नामी संधी होती. पण यावेळी जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर राहुल तेवातियाने त्याचा झेल सोडला. ऋतुराजला यावेळी एकही धाव नसताना जीवदान मिळाले होते. पण या जीवदानाचा फायदा ऋतुराजला उचलता आला नाही. मोठा फटका मारण्याच्या नादात ऋतुराज बाद झाला आणि त्याला यावेळी १० धावांवरच समाधान मानावे लागलेऋतुराज बाद झाल्यावर फॅफ ड्यू प्लेसिसने धडेकाबाज फलंदजाी केल्याचे पाहायला मिळाले. फॅफने यावेळी राजस्थानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. फॅफने यावेळी १७ चेंडूंत ३३ धावा केल्या, यामध्ये चार चौकार आणि दोव षटाकारांचा समावेश होता. फॅफ बाद झाल्यावर मोइन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी चांगली फलंदाजी केली. पण या तिघांनाही यावेळी मोठी धासंख्या साकारता आली नाही. राहुल तेवातियाने यावेळी मोइन अलीला बाद केले. राजस्थानचा युवा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाने यावेळी आपल्या १४व्या षटकात दोन बळी मिळवले आणि त्याने चेन्नईला दुहेरी धक्के दिले. साकरियाने यावेळी दुसऱ्या चेंडूवर अंबाती रायुडूला बाद केले, त्यानंतर पाचव्या चेंडूवर सुरेश रैनाला तंबूचा रस्ता दाखवला. रायुडूने यावेळी २७ धावा केल्या, तर रैनाला यावेळी १८ धावांवर समाधान मानावे लागले. रैना बाद झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला. धोनीने सुरुवातीला स्थिरस्थावर होण्यासाठी थोडा वेळ घेतला, पण त्यानंतर त्याने फटकेबाजीला सुरुवात केली. धोनीने यावेळी दोन चौकारांसह १८ धावा देता. साकरियाने पुन्हा एकदा चेन्नईला यावेळी धोनीच्या रुपात मोठा धक्का दिला.
चेन्नईने राजस्थानपुढे या सामन्यात १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला मनन व्होराच्या रुपात पहिला धक्का बसला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यावेळी फक्त एकाच धावेवर बाद झाला, हा राजस्थानसाठी मोठा धक्का होता. पण त्यानंतर जोस बटलरने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत राजस्थानची धावगती वाढवली होती. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात बटलर आऊट झाला. रवींद्र जडेजाने यावेळी बटलरने त्रिफळाचीत केले, बटलरचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले.जडेजाने याच १२व्या षटकात बटलरबरोबर शिवम दुबेलाही बाद केले आणि राजस्थानला दुहेरी धक्के दिले. त्यानंतर मोइन अलीने राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच नावचवले. अलीने यावेळी महागडा खेळाडू असलेला ख्रिस मॉरिस, रायन पराग आणि डेव्हिड मिलवर या तिघांनाही बाद करत सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला. 26 धावा आणि 3 विकेट्स घेणाऱ्या मोईन अली ला सामना वीर घोषित करण्यात आले.