शिखर आणि पृथ्वी शो; दिल्ली चा चेन्नई वर 7 विकेट्स नी विजय
पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 14 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने चेन्नईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. रिषभ पंतने टॉस जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी भाग पाडले. दिल्लीने 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्कियाची उणीव भरुन काढण्यासाठी इंग्लंडच्या ख्रिस वोक्स आणि टॉम करन या अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली. सुरेश रैना आणि मोईन अलीने चेन्नईचा डाव सावरला. चेन्नईने पहिले 2 विकेट झटपट गमावले. फॅफ डु प्लेसिस 0 वरच माघारी परतला. तर ऋतुराज गायकवाड 5 धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे चेन्नईने हे दोन्ही विकेट 7 धावांवर गमावले. त्यामुळे चेन्नईची खराब सुरुवात झाली. मात्र त्यानंतर अनुभवी रैना आणि चेन्नईकडून पदार्पण केलेल्या मोईनने डाव सावरला. चेन्नईने 19 व्या ओलव्हरमध्ये 23 धावा फटकावल्या. सॅम करनने या ओव्हरमध्ये टॉम करनच्या बोलिंगवर फटकेबाजी केली. सॅमने या ओव्हरमध्ये सलग 2 सिक्स लगावले. त्यानंतर 1 चौकार लगावला. चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 189 धावांचा आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. चेन्नईकडून मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या. मोईन अलीने 36 तर तसेच सॅम करनने 34 धावांची खेळी केली. दिल्लीकडून आवेश खान आणि ख्रिस वोक्स या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.चेन्नईने 189 धावांचे आव्हान दिल्यानंतर मैदानात आलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी झोकात सुरुवात केली आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने फटकेबाजी सुरु केली. धवन आणि शॉ ने पहिल्या विकेट्स साठी 138 धावांची भागीदारी करून सामना वन साईड करून टाकला. दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज अर्धशतकं झळकावत विजयाचा पाया रचला. शॉ ने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होतात. तर शिखरने 54 चेंडूत 85 धावा फटकावल्या. त्यात 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. चेन्नईचे सरसकट सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. शार्दुल ठाकूरला दोन विकेट्स मिळाल्या खऱ्या परंतु त्याने 3.4 षटकात तब्बल 53 धावा मोजल्या. ड्र्वेन ब्राव्होने 4 षटकात 28 धावा देत 1 विकेट मिळवली. उर्वरीत कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने ब्राव्होव्यतिरिक्त चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली.हे आव्हान दिल्लीने 3 विकेट्सच्या बदल्यात 18.4 षटकांमध्ये पूर्ण केलं. 85 धावा करणाऱ्या शिखर धवन ला सामनावीर घोषित करण्यात आले.