२३ मार्च ‘ जागतिक हवामान दिन ‘…
जगभरात 23 मार्च हा दिवस ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो. हवामान शास्त्राबरोबरच त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. सन १९५० मध्ये आजच्या दिवशी जागतिक हवामान संस्थेची स्थापन झाली आणि २३ मार्च या दिवसाची जागतिक हवामान दिवस म्हणून निवड करण्यात आली. हवामानाबाबत जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि हवामानाचे महत्त्व समजावे, तसेच हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता(काळजी)घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे, कारण आज २३ मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या पर्यावरणातील हवेमध्ये दैनंदिन अनपेक्षित दल होत आहेत, याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी लोकांना जागरूक करणे हा यामागील मुख्य हेतू आहे.
हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचे positive-negative परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था १९५० मध्ये स्थापन करण्यात आली होती. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. जागतिक हवामान संघटनेचे एकूण १९१ सदस्य देश व प्रांत आहेत. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल.दरवर्षी यासाठी एक थीम सेट केली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम केलं जातं.
जागतिक हवामान दिन २०२१ ची थीम –
जागतिक हवामान दिनाची यावर्षीची थीम ‘महासागर, जलवायू आणि हवामान,’ अशी आहे. यासह, जगातील शाश्वत विकासासाठी संयुक्त राष्ट्रांचे महासागर विज्ञान दशक देखील सुरू केले जात आहे. मागील वर्षी या दिवसाची थीम ‘हवामान आणि पाणी,’ अशी होती. यावर्षीच्या थीमवरून हे स्पष्ट होते की, त्याचा उद्देश महासागराच्या स्वच्छता आणि संवर्धनाशी संबंधित आहे.
जागतिक हवामान दिवस कसा साजरा केला जातो?
या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हवामानाचा नमुना आणि नैसर्गिक आपत्ती बदलणार्या गोष्टींविषयी लोकांना जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. जागतिक हवामान दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये अशा अनेक ठिकाणी वादविवाद, कला स्पर्धा आयोजित केल्या जातात. आज जागतिक हवामान दिनानिमित्ताने आपण प्रत्येकाने पर्यावरणाला शुद्ध, स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करू. यातूनच पृथ्वीवरील सजीव सृष्टी धोक्याबाहेर ठेवून मानवी जीवन आरोग्यदायी व आनंददायी होऊ शकतो.कोणी करत नाही म्हणून मी देखील करणार नाही आणि माझ्या एकट्याच्या करण्याने किती फायदा होईल? असा विचार न करता या कार्यात प्रत्येकाने आपल्या परीने जेवढं प्रयत्न केला तेवढं कमी आहे.चला तर सर्व मिळून आपण आपल्या पृथ्वीवर स्वच्छ, आरोग्यदायी व आनंदी जीवन जगू.