टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय नेमबाजी संघ जाहीर
१५ सदसिय भारतीय संघात मनु भाकर ची तीन इव्हेंट मध्ये निवड
जुलै पासून सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघ जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्राच्या राही सरनोबत, तेजस्विनी सावंत यांचा संघात समावेश झाला असून कोल्हापुरच्या स्वप्नील कुसलेची राखीव संघात निवड झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या वर्षी भारताने राखीव संघ देखील नेमला आहे.नेमबाजी महासंघाच्या वतीने हा संघ जाहीर करण्यात आला.
मनु भाकरची ३ इव्हेंट मध्ये निवड झाली आहे आणि तिच्याकडून पदकाची अपेक्षा असेल. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तिने पदकांची कमाई केली.
तसेच सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या वलारीवान वर सुद्धा सर्वांची नजर असेल.
यावर्षी भारतीय नेमबाजी संघ ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्वोतम कामगिरी करेल अशी भारतीय क्रीडा चाहत्यांनी अपेक्षा असेल.
भारतीय संघ :-
१०मी एअर रायफल
(पुरुष) – दिव्यांश, दीपक कुमार राखीव खेळाडू – संदीप सिंह, ऐश्वर्या प्रताप
(महिला) – अपुर्वी चंडेला, वलारीवान राखीव खेळाडू – अंजुम मुदगील, श्रेया अग्रवाल
१०मी एअर पिस्तुल
(पुरुष) – सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा राखीव खेळाडू – सहाजार रिझवी, ओम प्रकाश
(महिला) – मनु भाकर, यशस्विनी देशवाल राखीव खेळाडू – श्रिनिवीता, श्वेता
२५मी पिस्तुल(महिला) – मनु भाकर, राही सरनोबत राखीव खेळाडू – चींकी यादव, अभिज्ञा पास्कीट
(पुरुष) – अंगदविर सिंह, मेराज अहमद खान राखीव खेळाडू – गुरुज्योत सिंह, शीराज शेख
१०मी एअर रायफल मिश्र टीम
दीव्यांश – वलारीवानराखीव – दीपक कुमार – अंजुम मुदगील
१० मी पिस्तुल मिश्र टीम
सौरभ चौधरी – मनु भाकर राखीव – अभिषेक वर्मा – यशस्विनी
५० मी रायफल ३ पोझिशन
(पुरुष) – संजीव राजपूत – ऐश्वर्य प्रताप राखीव खेळाडू – चैन सिंह, स्वप्नील कुशले
(महिला) – अंजुम मुदगील – तेजस्विनी सावंत (राखीव ) – सुनिधी, गायत्री