भारताचा इंग्लडवर 36 धावांनी विजय: 3-2 ने मालिका घुंडाळली
भारताने इंग्लंडवर पाचव्या टी 20 सामन्यात 36 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 188 धावाच करता आल्या. या विजयासह टीम इंडियाने 3-2 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. टॉस जिंकून इंग्लंड ने प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला. इंग्लड ने संघात कोणताच बदल केला नाही. परंतु भारताने राहुल च्या जागी नटराजन ला खेळवले. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली ने भारताला चांगली सुरुवात करून दिली. भारताने पहिल्या 6 ओव्हर मध्ये 60 धावा केल्या. रोहित शर्मा ने आक्रमक 34 चेंडूत 64 धावा काढल्या यात त्याने 5 षटकार आणि 4 चौकार देखील ठोकले. हार्दिक पंड्या आणि सूर्य कुमार यादव ने देखील तुफानी फलंदाजी करत 39 आणि 32 धावा काढल्या. भारता कडून सर्वाधिक धावा कोहली नी केल्या. कोहली नी 52 चेंडूत 80 धावा केल्या यात 2 षटकार आणि 7 चौकार चा ही समावेश होता. इंग्लडन कडून रशीद आणि स्टोक्स ला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. भारताने इंग्लड ला 225 धावांचे लक्ष दिले. पर्वता इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतांना इंग्लंड ची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लड ची पहिली विकेट 0 वर पडली. परंतु त्या नंतर बटलर आणि मलान मध्ये 130 धावांची भागीदारी झाली. मलान ने सर्वाधिक 68 तर बटलर ने 52 धावा काढल्या परंतु या नंतर इंग्लंडचा कुठलाही फलंदाज फारश्या धावा काढू शकला नाही. शार्दुल ठाकूरने या सामन्यात एकूण 3 विकेट्स घेतल्या. त्याने एकाच ओव्हरमध्ये निर्णयाक क्षणी 2 विकेट्स घेत सामना फिरवला. शार्दुलने या संपूर्ण मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक 8 विकेट्स मिळवल्या.तर भुवनेश्वर कुमारने 2 फलंदाजांना माघारी धाडलं. भुवनेश्वर कुमारला सामनावीर तर कोहलीला मालिकावीर घोषित करण्यात आले.