भारत आणि ओमनची १-१ ने बरोबरी
१० भारतीय खेळाडूंनी केले आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण
भारतीय फुटबॉल संघाने गुरुवारी फिफाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ओमान सारख्या संघासोबत बरोबरी साधली.
दुसर्या सत्रात मनवीर सिंगच्या हेडरने भारताला बरोबरी मिळवून दिली.
दुबईतील बिन राशिद स्टेडियमवर 42 व्या मिनिटाला झहीर अल अघबरीने ओमनला आघाडी मिळवून दिली होती.
त्यापूर्वी भारताचा क्षेत्ररक्षक अमरिंदर सिंग याने पेनल्टी किक अडवून संघाचा आत्मविश्वास वाढवला. भारताच्या तब्बल १० खेळाडूंनी पदार्पण केले आहे .
कॅप्टन सुनील चेत्री कोरोनग्रस्त असल्यामुळे संघाबाहेर आहे.
इंडियन सुपर लीग स्पर्धेनंतर हे सामने होत असल्याने संघाचा सराव चांगला झाला असल्याचे दिसून येते.
वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत भारताने खराब कामगिरी केली होती,
त्यामुळे भारतीय संघाचे कोच इवन यांनी पुढील स्पर्धेची तयारी सुरू केल्यावर बऱ्याच
नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यात पदार्पण करणाऱ्या बिपीन सिंह ने उत्तम कामगिरी केली आहे.
त्याने मनविर सिंहच्या गोल मध्ये योगदान दिले.अव्वल संघाशी खेळताना चांगली कामगिरी केल्याने भारतीय यंग ब्रिगेडचा
आत्मविश्वास वाढला आहे .भारताचा दुसरा सामना दुबई समवेत होणार आहे.
ह्या सामन्यात पण भारताच्या नवीन खेळाडूकडून अपेक्षा आहे.