स्पोर्ट्स

चौथी कसोटी जिंकल्यास भारत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या वाटेवर

अंतिम कसोटीसाठी भारत सज्ज …

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी  सामना 4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. ही चौथी कसोटी टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी हा सामना जिंकावा किंवा अनिर्णित राखावा लागणार आहे. या उद्देशाने भारताच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. जर हा सामना इंग्लंड जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया पोहचेल सध्या पहिल्या स्थानी भारत तर दुसऱ्या स्थानी  न्यूजीलैंड आणि तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या वर परिणाम करणारा आहे . सगळ्यांच्या मनात सध्या खेलपट्टी बद्दल प्रश्न येत आहेत माघचा सामना सुधा ह्याच मैदानवर खेळला होता . भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे नी म्हणतला की माघच्या सामन्या सारखीच खेलपट्टी या वेळेस सुधा असेल परंतु या वेळेस गुलाबी नव्हे तर लाल चेंडू असल्याने फिरकीला कमी साथ मिळेल . नानेफेक हे महत्वपूर्ण असणार आहे कारण जो संघ आधी फलांदजी करेल त्याला जास्त फायदा मिळू शकतो . ही खेलपट्टी लाल माती नी बनवन्यात आली असल्याने फलंदाजी ला सुधा मदत मिळेल . व्यक्तिक कारणमुळे बुमराह नी चौथ्या कसोतीतून आपले नाव माघे घेतले आहे तर त्याच्या जागी कोण खेळेल हा मोठा प्रश्न आहे 

संभाव्य संघ

 भारत 

रोहित शर्मा , शुबमन गिल , चेतेश्वर पुजारा , विराट कोहली , अजिंक्य रहाणे , ऋषभ पंत , अक्षर पटेल , रविचंद्रन अश्विन ,वाशिंगटन सुंदर , इशांत शर्मा , मोहम्मद सिराज 

इंग्लंड 

जॅक क्रॉली , डॉन सिबली ,  जॉनी बेयरस्टॉ , जो रुट , बेन स्टोक्स  , ओली पोप , बेन फोक्स , जोफ्रा आर्चर , जैक लिच , स्टुअर्ट ब्रॉड , डोमिक बेस

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *