अक्षरच्या फिरकीवर नाचले इंग्लिश फलंदाज,इंग्लंड पहिला डाव सर्वबाद ११२
अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या डे – नाईट कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व मिळवलं आहे. दिवसखेर भारताने 33 षटकांत 3 बाद 99 धावांची खेळी केली.त्याआधी भारतीय संघाने इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर गुंडाळला. रोहित शर्माने भारताकडून 82 चेंडूत सर्वाधिक 57 धावा करत संघाला पहिला डावात विजयाच्या उंबरठयावर आणून ठेवले. तर, शुबमन गिलने 51 चेंडूत 11 , कर्णधार विराट कोहलीने 58 चेंडूत 27 धावा करत रोहितला साथ दिली . भारतचा फिरकीपटू गोलंदाज अक्षर पटेलने सर्वाधिक 6 गडी बाद केले. अनुभवी गोलंदाज आर अश्विनने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात इशांत ने ही एक गडी बाद करत हा सामना आपल्यासाठी अविस्मरणीय ठरवाला. यानंतर आता नाबाद असलेले फलंदाज रोहित आणि रहाणे दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या डावला कशाप्रकारे सुरुवात करतात, याकडे सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागलं आहे.
धावफलक
धावा चेंडू चौकार षटकार धावगती
जॅक क्रॉली पायचित अक्षर ५३ ८४ १० ० ६३.१
डॉन सिबली झेल रोहित बाद इशांत ० ७ ० ० ०
जॉनी बेयरस्टॉ पायचित अक्षर ० ९ ० ० ०
जो रुट पायचित अश्विन १७ ३७ २ ० ४५.९५
बेन स्टोक्स पायचित अक्षर ०६ २४ १ ० २५.००
ओली पोप बोल्ड अश्विन ०१ १२ ० ० ८.३३
बेन फोक्स बोल्ड अक्षर १२ ५८ १ ० २०.६९
जोफ्रा आर्चर बोल्ड अक्षर ११ १८ २ ० ६१.११
जैक लिच झेल पुजारा बाद अशविन ०३ १४ ० ० २१.४३
स्टुअर्ट ब्रॉड झेल बुमराह बाद अक्षर ०३ २९ ० ० १०.३४
जेम्स अँडरसन नॉट आऊट ० ३ ० ० ०
(एक्स्ट्रा : ६ (१ बाय , २ लेगबाय,३ नो बॉल )
षटक बिनधाव धावा बाद एकॉ.रेट
इशांत शर्मा ५ १ २६ १ ५.२
जसप्रित बुमराह ६ ३ १९ ० ३.२
अक्षर पटेल २१.४ ६ ३८ ६ १.८
रविचंद्रन अश्विन १६ ६ २६ ३ १.६
फॉल ऑफ विकेट
२-१,२७-२,७४-३,८०-४,८१-५,८१-६,९३-७,९८-८,१०५-९,११२-१०
धावफलक
धावा चेंडू चौकार षटकार धावगती
रोहित शर्मा नॉटआऊट ५७ ८२ ०९ ० ६९.५१
शुभमन गिल झेल क्रॉली बाद आर्चर ११ ५१ ०२ ० २१.५७
चेतेश्वर पुजारा पायचित लिच ० ०४ ० ० ०
विराट कोहली बोल्ड लिच २७ ५८ ३ ० ४६.५५
अजिंक्य रहाणे नॉट आऊट ०१ ०३ ० ० ३३.३३
(एक्स्ट्रा : ३ (२ बाय ,१ वाईड )
षटक बिनधाव धावा बाद एकॉ.रेट
जेम्स अँडरसन ९ ६ ११ ० १.२
स्टुअर्ट ब्रॉड ६ १ १६ ० २.७
जोफ्रा आर्चर ५ २ २४ १ ४.८
जैक लिच १० १ २७ २ २.७
बेन स्टोक्स ०३ ० १९ ० ६.३
फॉल ऑफ विकेट
३३-१,३४-२,९८-३.