आघाडीसाठी दोन्ही संघ उत्सुक
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा टि-२० सामना
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज तिसरा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.
या सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान ही ५ सामन्याची मालिका १-१ ने बरोबरीत आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेत दमदार पुनरागमन केलं.
त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न भारताचा असणार असेल तर दुसरीकडे इंग्लंडला सुद्धा सामना जिंकून आघाडी घेण्याची संधी आहे.
पदार्पणातील सामन्यात सलामीवीर इशान किशनने शानदार अर्धशतकी खेळी केली. यात त्याने 56 धावा ठोकल्या. तर दुसऱ्या बाजूने के एल राहुल अपयशी ठरला.पहिल्या सामन्यात शिखर धवनही अपयशी ठरला होता. इशानने पदार्पणातील सामन्यात संधीचं सोनं केलं. केएल राहुलच्या जागी अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला या सामन्यात खेळवल्या जाऊ शकते.इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या इशान किशन, विराट कोहली आणि रिषभ पंत या त्रिकुटाला रोखण्याचे आव्हान असणार आहे. या तिघांनी दुसऱ्या सामन्यात जोरदार फटकेबाजी केली होती. त्यामुळे या तिघांना रोखण्याचे आव्हान इंग्लंडसमोर असेल. भारताची नजर ही मालिका ४-१ च्या आघाडीने जिंकण्यावर असेल.जर भारत ही मालिका ४-१ नी जिंकली तर भारत आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर जाऊ शकते.
संभावित संघ
भारत :
रोहित शर्मा, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर,सूर्य कुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर.
इंग्लंड:
जॉस बटलर , जेसन रॉय , ओइन मॉर्गन , डेविड मलान , जॉनी बेस्त्रो , बेन स्टोक्स , सैम करण,क्रिस जॉर्डन, आदिल राशिद , टॉम करण, जोफ्रा आर्चर