भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे आज
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना आज खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना जिंकल्या वर आता भारत
हा सामना जिंकून मालिका घुंडाळण्याच्या प्रयत्नात असेल तर इंग्लड 1-1 ने बरोबरी करण्यात .
इंग्लडचा कर्णधार इयॉन मॉर्गन दुखापती मूळे पुढील दोन्ही सामने खेळणार नाही
त्याच्या जागी जॉस बटलर कर्णधारपद सांभाळणार आहे तर भारतीय संघात देखील बदल
होऊल श्रेयस अय्यर देखील दुखापती मुळे या मालिकेतील कोणताही सामना खेळणार नाही आहे
त्याच्या जागी कोणाला खेळायला मिळेल याची सर्वांना उत्सुकता आहे.
सुर्यकुमार यादवचे पदार्पण देखील होऊ शकते. सूर्यकुमार यादव हा सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे.
त्यामुळे त्याला यावेळी पहिली पसंती मिळू शकते.
कारण मधल्या फळीत सूर्यकुमार चांगली फलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर रिषभ पंतच्या नावाचीही यावेळी जोरदार चर्चा आहे.
कारण पंत हा भारतीय संघाकडून बऱ्याचदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आहे. त्यामुळे या स्थानावर खेळण्याचा त्याला जास्त अनुभव आहे.
त्यामुळे आता श्रेयसच्या जागी सूर्यकुमार आणि रिषभ यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
तर सलामीवीर रोहित शर्माची दुखापत गंभीर नसली तरी त्याला आराम दिला जाऊ शकतो.
त्यावेळी शिखर धवनबरोबर सलामीला कोण येणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
भारतीय संघात शुभमन गिल हा युवा सलामीवीर आहे. त्यामुळे त्याला यावेळी संधी मिळण्याची शक्यता आहे.
गिलने आतापर्यंत कसोटी सामन्यात भारताच्या सलामीची जबाबदारी पार पाडली आहे.
पण जर गिलला विचार केला जात नसेल तर लोकेश राहुल यावेळी सलामीला येऊ शकतो.
कारण राहुलने यापूर्वी भारताची सलामीची जबाबदारी निभावलेली आहे. त्यामुळे जर गिलचा विचार झाला नाही तर राहुल हा सलामीला येऊ शकतो.
भारतीय गोलंदाजांनी गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पदार्पण करणाऱ्या प्रसिध कृष्णनने पहिल्या वनडेमध्ये सर्वाधिक चार बळी मिळवले होते.
त्याचबरोबर शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारदेखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याचबरोबर पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्यानेही चांगली कामगिरी केली आहे.
त्यामुळे गोलंदाजीमध्ये जास्त बदल होणार नसल्याचे सध्याच्या घडीला दिसत आहे.