जोफ्रा आर्चरसमोर ढासळले भारताचे फलंदाज,इंग्लंंडचा भारतावर ८ विकेट्सनी विजय;अय्यरचे अर्धशतक व्यर्थ
इंग्लंंडने टेस्ट मालिकेचा बदला घेत टी-२० मालिकेची विजयाने सुरवात केली. इंग्लंंडने अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ८ विकेट्सनी जबरदस्त विजय मिळवला. यासह ५ मैचच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. इंग्लंंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाचे टॉप आर्डरचे फलंदाज लवकर बाद झाले. भारताची २०/३ अशी अवस्था झाली होती. यानंतर श्रेयश अय्यर आणि हार्दिक पांड्याच्या जोड़ीने विकेट्स वाचवुन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यानंतर हार्दिकसुद्धा लवकर बाद झाला. श्रेयश अय्यरने सर्वाधिक ४८ चेंडूत ६७ धावा केल्या. त्यात त्याने १ षटकार आणि ८ चौकार ठोकले. इंग्लंंडकडून आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. भारताने इंग्लैंडला फक्त १२५ धावांचंं लक्ष दिलंं होतं . १२५ सारख्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि जॉस बटलरनी सुरुवातीलाच फटकेबाजी करत सामना इंग्लंंडच्या बाजूने झुकवून टाकला. इंग्लंंडकडून रॉयने सर्वाधिक ३२ चेंडूत ४९ धावा केल्या. त्यात त्याने ३ षटकार व ४ चौकार मारले. बटलरने २८, मलानने २४ तर जॉनी बेयरस्टॉने २६ धावा केल्या. भारताकडून चहल आणि सुंदरने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चरला सामनावीर घोषीत करण्यात आले.
कोण आहे श्रेयश अय्यर ?
श्रेयस अय्यर हा भारतीय क्रिकेटपटू आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून तर घरगुती क्रिकेटमध्ये मुंबई आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्लीच नेतृत्व करतो. उजव्या हाताचा फलंदाज अय्यरने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अय्यरने २०१४ मध्ये अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १ नोव्हेम्बर २०१७ मध्ये अय्यर पहिल्यांदा भारतासाठी टी-२९ सामना खेळला होता. अय्यरने भारताकडून आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ४५ सामन्यांत १३०३ धावा केल्या आहेत. ११८ चौकार आणि ३८ षटकार मारले आहेत, तर आईपीएलमध्ये ७९ सामन्यात २२०० धावा केल्या आहेत. त्यात त्याने १८९ चौकार तर ८३ षटकार मारले आहेत.