भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी-२० सामना आज
भारत आणि इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत इंग्लंडकडे १-० ची आघाडी आहे.
आता दुसऱ्या टी-२० सामन्यात भारत हिशोब बरोबर करण्याच्या दृष्टिने उतरेल तर इंग्लंड या मालिकेत स्वतःची पकड़ मजबूत करण्याच्या दृष्टिने उतरेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात दूसरा टी-२० सामना आज संध्याकाळी ७ वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळल्या जाणार आहे.
पहिल्या सामन्याच्या पराभवानंतर भारत संघात काही बदल करु शकतो. पहिल्या सामन्यात उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती, परंतु सगळ्या क्रिकेट तज्ञांचे म्हणे होते की, रोहितला खेळवायला पाहिजे होते.
खेळपट्टीनी फिरकीला जास्त साथसुध्दा दिली नाही.
यामुळेच भारत ३ फिरकीपटूमधून एका फिरकीपटूला बाहेर करू शकतो. याजागी वेगवान गोलंदाज दिपक चहरला जागा मिळू शकते. इंग्लंडच्या संघात कोणताच बदल होण्याची शक्यता दिसत नाही.
खेळपट्टी कशी असेल ?
पहिल्या टी-२० सामन्यात फिरकीला फारशी साथ मिळाली नव्हती. दुसरा सामनासुद्धा त्याच मैदानावर खेळवण्यात येत आहे.
या सामन्यात खेळपट्टी फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीसाठी अनुकूल असेल अशा शक्यता आहेत.
संभावित संघ
भारत
के एल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, दिपक चहर
इंग्लंड
जॉस बटलर, जेसन रॉय, ओइन मॉर्गन, डेविड मलान, जॉनी बेस्त्रो, बेन स्टोक्स, सैम करण,क्रिस जॉर्डन, आदिल राशिद, मार्क वूड, जोफ्रा आर्चर