हेल्दी आणि चमकदार केस हवेत..? मग हे घरगुती उपाय कराच….
हेल्दी आणि चमकदार केस आपल्या सगळ्यांनाच हवे असतात.त्यासाठी आपल्याला महागड्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन महागाची हेअर केअर ट्रीटमेंट घ्यावी लागेल किंवा इतर महागडे हेअर केअर प्रॉडक्ट्स वापरावे लागतील अस गरजेचं नाही.आपण आपल्या घरगुती उपायांनी देखील आपल्या केसांची निगा अगदी उत्तम रित्या राखू शकतो.आणि इतर केमिकलयुक्त हानिकारक प्रॉडक्ट्स सारखी काही साईड इफेक्ट देखील ह्या उपायांनी होत नाही. चलातर मग जाणून घेऊया स्ट्राँग केसांसाठी काही खास घरगुती उपाय…
१.तेलाचा मसाज (Oil Massage)
तेलाचा मसाज किंवा केसांना ऑईल मसाजिंग करणे हा एक सर्वात जुना आणि पारंपारिक उपाय आहे.हा उपाय तुमच्या केसांना जास्त चमकदार आणि मऊ बनवतो. तुम्ही केसांना ऑईल मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, कोकोनट ऑईल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करू शकता. केसांना ऑईल मसाज करण्यासाठी थोडंसं कोमट तेल घ्या आणि स्कॅल्पला चांगला मसाज करा. तासभर केस तसेच ठेवा आणि नंतर धुवून टाका. जर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करणार असाल तर ते तुम्ही रात्री झोपताना लावून सकाळी धुवू शकता. हे एक बेस्ट कंडीशनर असून तुमच्या केसांची गळती रोखतं आणि केसांच्या मुळांना बळकट करतं. निरोगी केसांसाठी हा उत्तम उपाय आहे.
२.मध (Honey)
मधाचा वापर आपण फक्त त्वचेसाठीच नाहीतर केसांसाठी देखील करू शकतो. खराब झालेल्या आणि गळती होणाऱ्या केसांवर मध हा उत्तम घरगुती उपाय आहे. मधाचे काही थेंब तुमच्या शँपू किंवा कंडीशनरमध्ये अॅड करून आपण केस धुवू शकतो त्याने आपले केस अगदी मुलायम होतात.
३.मेथीच्या बिया (Fenugreek Seeds)
खुप वर्षांपासून मेथीच्या बियांचा वापर हा केसांच्या समस्येवरील एक खूपच सोपा उपाय मानला जातो. आपल्या प्रत्येकाच्या स्व्यंपाकघरा मध्ये मेथीही सहज उपलब्ध असते. दोन चमचे मेथीच्या बिया घेऊन त्या कोरफडीच्या एका तुकड्यामधे रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवून घ्या आणि तुमच्या स्कॅल्पवर लावा. अर्ध्या तासाने धुवून टाका. या उपायाने तुमची केसाची गळती नक्कीच कमी होईल आणि कोंड्याची समस्याही दूर होण्यास मदत होईल.
४.आवळा (Amla)
आवळ्याचा उपयोग हा मजबूत आणि निरोगी केसांसाठी अनेक वर्षांपासून केला जातो. आर्युवेदातील आवळा हा एक प्रमुख घटक आहे. लिंबाचा रस आणि आवळा पावडर मिक्स करून केसांच्या मुळांना या मिश्रणाने हळूवार मसाज करा. हा लेप केसांना 20 मिनिटं ठेवा आणि मग धुवून घ्या यांनी आपल्या केसांना चमक येते व केस मुळापासून मजबूत बनतात.
५.बिअर ट्रीटमेंट (Beer Treatment)
हो तुम्ही बरोबर वाचताय… बिअरचा वापर केसांसाठी सुध्दा केला जातो.बिअरने केस चमकदार होण्यासाठी मदत होते. थोड्याश्या बिअरने केस धुतल्यास ते सुंदर आणि चमकदार दिसू लागतात. तुम्ही बिअर केसांवर स्प्रे सुध्दा करू शकता. आजकाल बाजारात सुद्धा बिअर शँपूही अगदी सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. इस्टंट चमकदार केस हवे असतील तर धुतलेल्या केसांवर अगदी हलकी बिअर स्प्रे करून टॉवेलने हळुवार पुसा. केस लगेच चमकदार दिसतील.