लाइफस्टाइल

कोरोनाव्हायरस संसर्ग टाळण्यासाठी घराची स्वच्छता कशी कराल ? अशी घ्या काळजी!

घराची साफसफाई करताना बहुतेक वेळा स्पंच, पोछा जुन्या कपड्यांचा वापर केला जातो. मात्र या वस्तूंची स्वच्छता करणेही महत्त्वाचे आहे.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे,भारतातही कोरोनाचे सध्या खूप रुग्ण आढळून येत आहे.

दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून याबाबत उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी ही खबरदारी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत .

सार्वजनिक ठिकाणी वावरताना तेथील स्वच्छता आपल्या हातात नसले तरी आपले घर स्वच्छ आरोग्यवर्धक बनवू शकतो.

केवळ कोरोनाव्हायरस पासून बचावासाठी नव्हे तर दैनंदिन आयुष्य ही सुदृढ आनंदी हवे असल्यास स्वच्छ ते शिवाय पर्याय नाही.

त्यासाठी काही गोष्टी प्राधान्याने करणे आवश्यक आहे. वारंवार हाताळणाऱ्या वस्तूतून व्हायरस हा प्रामुख्याने स्पर्शाने पसरत आहे.

तुम्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संसर्ग होतो. त्यात तुमची श्वास क्रिया ज्ञानंद्रिये प्रतिकार क्षमता कमकुवत होते.

 त्यामुळे घरातील वारंवार स्पर्श होणाऱ्या जागा

उदा. दारे-खिडक्या, टेबल स्वच्छ असणे आवश्यक आहे .

यासाठी कोणतेही विशेष  सॅनिटाईझर वापरण्याची गरज नाही. घरातील डिटर्जंट पाण्यात मिसळून या वस्तू साफ करता येतात , घरात जितकी स्वच्छता ठेवाल तितका संसर्ग टाळता येईल.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी अत्यावश्यक आणि दिवसभर आपल्या सोबत असलेला मोबाईल संसर्ग पसरविण्याचे साधन ठरू शकते.

त्यामुळे त्याची स्क्रीन कोमट पाण्याने अथवा रुमाल ओलसर करून दररोज पुसणे आवश्यक आहे.

याशिवाय संगणक ,कीबोर्ड ,माऊस, लँडलाईन ,फोन रिमोट ही निर्जंतुक असणे आवश्यक आहे. कुटुंबातील आजारी व्यक्तीची विशेष काळजी घ्या.

तिची विशेष काळजी घ्यायला हवी.  त्यांना स्वतंत्र रूम बाथरूम ची व्यवस्था करा त्यांची प्रतिकारक्षमता वाढविण्यावर भर द्या.

त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणे , टाळा पुरेसा सूर्यप्रकाश येईल अशी त्यांची खोली असावी , खोलीत किमान गरजेच्या वस्तू ठेवून अधिक अधिक मोकळी जागा ठेवावी.

जेणेकरून त्यांची स्वच्छता राखणे सहजशक्य होईल ,टॉयलेट ,शॉवर  सिंग यांची वारंवार स्वच्छता करायला हवी म्हणजेच संसर्ग टाळण्यासाठी मदत होऊ शकेल.

घरातील व्यक्तींनी आपापले ब्रश वेगळे ठेवावेत , हात पुसण्यासाठी वापरण्यात येणारा नॅपकिन नही नियमित धुतला जावा.

आजारी व्यक्तीसाठी स्वतंत्र नॅपकिन ठेवावा , किचनही स्वच्छ आणि नेटकी ठेवावे ,तसेच खाद्य पदार्थ बनवताना आपले हात स्वच्छ असतील याची काळजी घेण्यात यावी.

स्वच्छतेसाठी वापरातील साधने बहुतांश वेळा स्पंज जुने कपडे चा वापर केला जातो मात्र या वस्तूंची ही स्वच्छता महत्त्वाची असते.

कारण या वस्तू मधूनच जंतू तयार होतात ,अथवा त्यातून वास येतो त्यामुळे त्या वारंवार बदलत राहणे गरजेचे आहे.

पुन्हा पुन्हा वस्तू वापरत असतील तर त्या नियमित धुणे अथवा खडक उन्हात वाढवणे आवश्यक आहे जीवनशैलीत स्वच्छता प्रभावी,

सुदृढ आरोग्य आणि आनंदी जीवनशैलीत स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे , तुम्ही घर कितीही सजवा महागड्या वस्तूंनी सुशोभित करा,

मात्र जोपर्यंत ते स्वच्छ नीटनेटकं नसेल तोपर्यंत घरातील व्यक्तीचे आरोग्य उत्तम आरोग्य वर्धक होऊ शकणार नाही,

त्यामुळे घराच्या आकारापेक्षा त्याची स्वच्छता जीवनशैलीत अधिक प्रभावी ठरते.

ऋतुजा औटी

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *