हॉलीवूड आणि चिनच्या वादाचा फायदा भारताला
हॉलीवूड चित्रपटात भारतीय कलाकार आणि पात्रे वाढणार नाहीत तर त्याच्या चित्रीकरणातही वाढ होईल….
अमेरिकेने कोरोना वैश्विक महामारी साठी चीनला जबाबदार धरल्याने चिनच्या लोकांनी हॉलीवूड चित्रपटांपासून तोंड फिरवले आहे.
तर दुसरी कडे क्रिस्टोफर नोलन यांचा ‘टेनेट’ आणि DC ची सुपरहीरो चित्रपट ‘वंडर वुमन’च्या नंतर हॉलीवूडला भारतीय बाजाराची ताकद लक्षात आली आहे.
कोरोनामुळे अमेरिकेत चित्रपटगृह बंद असताना भारतात प्रदर्शित या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला. टेनेटने १२.४३ कोटीचा तर वंडरवुमनचे १५.५४ कोटी रुपयांचा
बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले.
भारतीय लोकांचा चित्रपट प्रेम आणि भारतीय चित्रपट बाजारातून होणारा मोठा फायदा पाहूनहॉलीवूडचे प्रख्यात दिग्दर्शक आणि स्टुडिओ चित्रीकरणासाठी भारतात जायला
आणि भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीने चित्रपट करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर काश्मीर, मुंबई, जयपूर, दिल्ली, कोलकाता, गोवा, एमपीसह अनेक पर्याय चित्रीकरणासाठी आहेत
भारतात चित्रपट उद्योग व प्रेक्षकांची क्षमता बघून चित्रपट डबिंगचे बजेटही दुप्पट केल
हॉलीवुडने चांगलेच ओळखले की भारतामध्ये भारतीय भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यास, चित्रपट बाजारात मोठी कमाई होते. यामुळे हॉलीवुड डबिंग आर्टिस्टला दुप्पट पैसे देणार आहे.
याचा डबिंग आर्टिस्ट मोठा फायदा होणार आहे.
एप्रिल महिन्यात भारतात जेम्स बाँडचा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ येईल.‘ब्लॅक विडो’ मे महिन्यात व फॉस्ट अँड फ्यूरिस मालिकेतील ‘एफ ९’, जुलैत टॉम क्रूझचा ‘टॉप गन : मेवेरिक’ प्रदर्शित
होनार. याचा फायदा हॉलीवुड सोबतच भारतालाही होईल.