होळी विशेष : देश एक, सण एक, रंगही तेच पण परंपरा अनेक
होळी हा रंगांचा सण असतो. फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण येतो. होलिकेचे दहन केल्यामुळे चांगल्याचा वाईटावर विजय झाला याकारणाने होळी साजरी केली जाते.एकत्र एकत्र येऊन एकमेकांना रंग लावणे म्हणजे होळी. अशाप्रकारे होळी सर्वत्र साजरी होत असली तरी. भारताच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची होळी साजरी केली जाते. प्रत्येक राज्याची प्रथा,परंपरा इतिहास वेगळा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी रंगपंचमी वेगवेगळी असते.
बघुयात की काही प्रसिद्ध ठिकाणी होळी कशी साजरी होते
उत्तराखंड –
कुमाऊनी होळी हा उत्तराखंडचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उत्सव आहे. त्यांच्यासाठी होळी म्हणजे फक्त चांगल्याचा वाईटावर विजय मिळवणे न्हवे हिवाळा संपून पेरणीचा हंगाम सुरू होणे आहे त्यामुळे या होळीला शेतकऱ्यांमध्ये विशेष महत्त्व आहे वसंत पंचमीला ही होळी सुरू होते आणि दोन महिने चालते. पुरुष पांढरी टोपी कुर्ता, महिला पारंपारिक चुडीदार घालून ही होळी साजरा करतात. कुमाऊनी होळी एक संगीत सोहळा असतो ज्याच्यात लोकं ढोल जोडा आणि हुरका हे वाद्य अजून खडी होळीचे गाणे म्हणतात. ते सगळे पारंपारिक गाणे म्हणून सोबत फिरतात अणि लोकांना अभिवादन करतात. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची भरभराट होवो असा आशीर्वाद त्यांना देतात. कुमाऊनी होळी चे विविध गाणी पश्चिम भारतात खूप प्रसिद्ध आहे.

उदयपूर –
उदयपुर ची होळी खूप भव्य आणि शाही पद्धतीने साजरी केली जाते. उदयपूर ची रॉयल फॅमिली यामध्ये सहभाग घेते. सिटी पॅलेस मध्ये होलिका दहन होते ज्याला मेवाड होलिकादहन असेही म्हणतात. मेवाडचा राजा आणि त्यांचे कुटुंब होलिका दहनाची शुभ सुरुवात करतात . नंतर तिथे लोक बॉनफायर समोर ‘ गैर ‘नावाचे लोक नृत्य करतात.रॉयल कुटुंबाचे हत्तीवर बसून रॅली काढली जाते त्यानंतर सिटी पॅलेस मध्ये रात्री फटाके उडवले जातात त्यांचा प्रकाश इतका असतो की तो पूर्ण उदयपूर शहराला दिसतो. होळीच्या दिवशी कुठे पुढच्या प्रत्येक हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये लाईव्ह डीजे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.होलिका दहनपासून रंगपंचमी पर्यंत उदयपुर ची होळी खूप भव्य आणि मोहक होते.

उत्तरप्रदेश –
उत्तरप्रदेशमध्ये हजारो लोकं एकत्रितपणे ‘लाठमार होळी’ साजरी करतात. बरसाना चा राधारानी मंदिरात बायका पुरुषांना लाठीने मारतात त्यापासून पुरुष स्वतःचा बचाव करतात अशी इथे परंपरा आहे. खूप मजेशीर अशी ही प्रथा असल्यामुळे लाठमार होळी उत्तर प्रदेश मध्ये प्रसिद्ध आहे. लाठ मार चा अर्थ काठीने मारणे असा होतो. नृत्य करणे,रंग लावणे याव्यतिरिक्त पारंपारिक पेय ‘थंडाई’ पिऊन तिथले निवासी होळी साजरी करतात.
लाठमार प्रथा का पडली –
नंदगाव मध्ये राहणारे भगवान कृष्ण बरसाना मध्ये राहणाऱ्या राधाला रंग लावण्यासाठी मित्रांसोबत यायचे. भगवान कृष्ण राधा आणि तिच्या सखींना रंग लावून मस्करी करायचे हे बघून चिडलेल्या राधा आणि तिच्या मैत्रिणी लाठी घेऊन त्यांच्या मागे लागायचे.

गुजरात –
होळीच्या दिवशी बॉन फायर करून त्याला नारळ चढवतात. धुलिकेच्या दिवशी पारंपारिक गुजराती पोशाखात सगळेजण जमा होतात. होळीच्या दिवशी पांढरी कपडे घालायची पद्धत असते पण गुजरातमध्ये होळीच्या दिवशी रंगीबिरंगी कपडे घालतात. गुजरातच्या द्वारकामध्ये द्वारकादास मंदिरात गाण्यांचा कार्यक्रम आणि मनोरंजक खेळ दाखवून, एकमेकांवर पाणी टाकून आणि रंग लावून होळी साजरी केली जाते. गुजरात मध्ये होळी रब्बी पिक पेरणीचा हंगाम आल्याचे प्रतीक आहे. अहमदाबादमध्ये रस्त्यावर ताकाचा मटका लटकवला जातो पुरुष ते तोडण्याचा प्रयत्न करतात आणि महिला त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्यावर पाणी आणि रंग टाकतात.

बिहार –
बिहार मध्ये होळी म्हणजे रंग, पक्वान्ने आणि बेभान नृत्य. बिहार मध्ये रंग आणि मातीने होळी खेळली जाते. होळीची सुरुवात पकोडे,मालपुवा, दही वडा,पुरी आणि देहती बनवण्यापासून होते. भोजपुरी गाना वर बेभान नृत्य करून होळीचा आनंद घेतला जातो. संध्याकाळी एकमेकांना गुलाल लावला जातो तर पायांना गुलाल लावला जातो, हे त्यांच्याकडून आशिर्वाद घेण्याचे प्रतीक आहे.
