फिल्मफेअर मध्ये हिरकणीचे यश, मिळवले तब्बल नऊ पुरस्कार
अक्षय बर्दापूरकार यांनी फिल्मफेअर पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे. याबद्दल त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर माहिती दिली. प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर पुरस्कार यासाठी नामांकन जाहीर करण्यात आले आहे. या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार २८ फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये ऐतिहासिक नाटक हिरकणी या चित्रपटासाठी १ नाही, २ नाही तर एकूण ९ पुरस्कार वेगवेगळ्या श्रेणीसाठी देण्यात येणार आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी या चित्रपटासाठी नामांकन सुरू केल्यापासून या चित्रपटाच्या टीमने वेगवेगळ्या एकूण ९ पुरस्कारांसाठी नामांकन पटकावले आहे. हिरकणी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओक यांना नामांकन देण्यात आले आहे. त्याचबरोबर हिरकणी फेम सोनाली कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम पुरस्कारासाठी संगीतकार अमितकुमार यांना नामांकन देण्यात आले आहे. त्याचबरोबर गायिका मधुरा कुंभार यांना सर्वोत्कृष्ट गायिका तर नरेंद्र भिडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोअर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. आणि शेवटचा सर्वोत्कृष्ट पोशाख पुरस्कारासाठी डिझायनर पौर्णिमा ओक यांना नामांकन देण्यात आले आहे.