भारताची ‘ढिंग एक्सप्रेस’ हिमा दास बनली आसामची डीएसपी,पोलीस च्या वर्दीत दिसला रुबाबदार अंदाज
भारताची स्टार धावपटू (रनर) हिमा दास ची आसाम पोलीस मध्ये डिप्टी सुपरिटेंडेंट (डीएसपी) पदावर निवड झाली. हिमा दास ने शुक्रवारी ड्युटी जॉईन केली . पोलीस च्या वर्दीत हिमाचा लुक खूपच रुबाबदार दिसत होता. सांगायला हवा की मागील दिवसांत आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत हिमाला डिप्टी सुपरिटेंडेंट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
केंद्रीय खेळ मंत्री किरण रिजिजू यांनी हिमाला शुभेच्छा देत सोनवाल यांचे आभार मानले. राज्य सरकारचे प्रवक्ता तसेच उद्योग मंत्री मोहन पटवारी यांनी सांगितलं होतं की हिमाला आसाम पोलीस मध्ये DSP बनवला जाईल , त्याच बरोबर ऑलम्पिक, एशियाई गेम्स आणि राष्ट्रमंडळ खेळांमध्ये पदक विजेत्यांना क्लास-। अधिकारी बनवण्यात येईल.
२१ वर्षाची हिमा दास ढिंग एक्सप्रेस (Dhing Express) नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. हिमा दास चा जन्म आसाम मधील ढिंग गावात झाला. ती आयएएफ वर्ल्ड अंडर- २० चॅम्पियनशिपच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय ॲथलिट आहे. हिमाच्या नावावर 400 मीटर धावण्यात राष्ट्रीय रेकॉर्ड सुद्धा नमूद आहे. एफ