Uncategorized

उष्माघात म्हणजे नेमके काय आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?

उन्हाळ्यात  उष्माघात होण्याचे प्रमाण वाढत आहे . खूप उन्हात फिरल्याने आपल्या शरीरातील तापमान वाढते ज्याने उष्माघाताची शक्यता वाढू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात त्याची काळजी घेतली पाहिजे.

उष्माघात म्हणजे नेमके काय ?

बाहेरच्या तापमानामुळे शरीरातील तापमान 104 F पर्यंत वाढते. मळमळ होते आणि उलट्या होतात. चक्कर येण्याची शक्यता आहे. हार्टबीट वेगाने वाढतात. शरीर लाल  पडते. आंतरिक शरीराचे  तापमान वाढल्यामुळे मृत्यू होऊ शकतो. उष्माघात मानवी शरीरासाठी घातक आहे त्यामुळे त्याची काळजी घ्यायला हवी.

१) उन्हातून आल्यावर पाणी पिणे टाळावे – उन्हापासून बचाव करण्यासाठी पाणी प्यावे हे खरे आहे पण काही जणं उन्हातून आल्यावर पाणी पितात जे अत्यंत  चुकीचे आहे. उन्हातून आल्यानंतर शरीरातल्या आंतरिक तापमान वाढलेले असते या परिस्थितीला आपण जर थंड गोष्ट शरीरात टाकली तर शरीराचे तापमान अचानक बदलून ते घातक ठरू शकते.त्यामुळे कधीही उन्हातून आल्यावर बाहेरची शरीर थंड करावे हातपाय धुवावे,आंघोळ करावी आणि मगच थंडपेय याचा समावेश करावा. हा उष्माघात टाळण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे.

२) सनस्क्रीन लावावे – घरातून बाहेर पडताना उन्हापासून बचावासाठी सनस्क्रीन लावावे. उन्हामुळे शरीर लाल पडू शकते जे आपल्या स्किन साठी हानिकारक ठरू शकते. संस्कृत लावल्यामुळे सूर्याची हानिकारक  किरणे शरीराच्या मध्ये पोहोचत नाही आणि उष्माघातापासून  त्याचा बचाव होतो.

३) उन्हात व्यायाम करणे टाळावे – लवकर घाम येत असल्यामुळे काही लोक उन्हात व्यायाम करतात. उन्हात व्यायाम करणे टाळावे. सकाळी 11 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळावे कारण या वेळात उतरतो ऊन असते जे शरीरासाठी खूप हानिकारक असते. आपलं शरीर उतरत्या ऊनाला संवेदनशील असते त्यामुळे घरातच व्यायाम करावा. घाम आल्यानंतर पाणी प्यावे घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि थकवा जाणवतो. लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना पाणी पिण्याची आठवण राहत नाही त्यामुळे  या वयोगटातील लोकांमध्ये उष्माघाताचे प्रमाण जास्त आहे. दर एक-दीड तासाने पाणी पीत राहावे. शरीर आतून आणि बाहेरून थंड ठेवावे.

४) तापमान वाढवणारे अन्नाचे सेवन टाळावे – असे काही अन्न  आहे जे आपण नियमितपणे घेतो पण उन्हाळ्यात याचे सेवन टाळावे. या अन्नामुळे शरीरातील तापमान वाढते. तेलकट  खाऊ नये. मांसाहारी जेवण टाळावे कारण मांसाहारी जेवण पचायला जड असते ज्यामुळे थकवा येतो आणि शरीरातील ऊर्जा कमी होते. कॉफी सारखे गरम पेय टाळावे थंडपेयांचा  यांचा समावेश करावा.

हीट स्ट्रोक आल्यावर काय काळजी घ्यावी ?                     

हीट स्ट्रोक आल्यावर हृदयाचे ठोके गतीने वाढतात वेळीच उपचार नाही झाले तर हृदय मेंदू आणि किडनी या अवयवांना हानी पोहोचू शकते.   हीट स्ट्रोक आल्यावर त्या व्यक्तीचे अंगावरचे काही कपडे काढून टाकावे शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. ती व्यक्ती बेशुद्ध असेल तर तिला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करावा. त्या व्यक्तीला घाम आला नसेल आणि शरीर लाल झाले असेल तर त्वरित डॉक्टरकडे घेऊन जावे. 

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *