समस्या डोकेदुखीची!!
डोकेदुखी ही समस्या प्रत्येक माणसाला जाणवते. कोणाचे डोके बारीक दुखते तर कोणाच्या डोक्यातून चमका येतात. कोणाचे डोके ठणठण करते तर काहींच्या डोक्यातून मुंग्या येतात. बघूयात डोकेदुखीची कारणे आणि उपाय :
१ सर्दी :हवेतील गारठा थंडपणा अॅलर्जी इत्यादी कारणांनी होणारी सर्दी नाकाच्या परिसरात साठून बसते, आणि तिथे सूज येते. प्रतिकारशक्ती वर्धक कफनाशक सुज नाहीशी करणारी औषधे घेतल्याने यातून मुक्तता मिळू शकते .
२ पित्तामुळेची डोकेदुखी : स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या या प्रकारात डोके दुखणे जास्त प्रमाणात आढळते. जळजळ होणे, मळमळ होणे पित्त पडून थोडे बरे वाटणे काही अर्वेदिक औषधे घेतल्यास बऱ्याच प्रमाणात फरक पडतो .
३ मायग्रेन : अर्धे किंवा काही वेळेला संपूर्ण डोके दुखणाऱ्या या प्रकारात जांभया यावयास लागून मानसिक असवच्छत नैराश्या आळशीपणा येऊन वेड्या वाकड्या रेषा व वर्तुळे चमकतात. यामध्ये प्रकाश सहन होत नाही डोक्यावरील शिर उडू लागते मळमळ होऊन उलटी होते व काही प्रमाणात बरे वाटू लागते. काही दिवसांनी हा त्रास पुन्हा जाणवू लागतो. या प्रकारात आयुर्वेदिक औषधे सातत्याने घेतलाय पंचकर्म केल्यास निश्चीत नियंत्रण येऊ शकते. अनेमिया, रक्ताची कमतरता, तरुण मुलीत ,जास्त कष्ट करणाऱ्या गृहिणी मध्ये आढळणाऱ्या या प्रकारात डोकेदुखीची जोडीला दम लागणे ,चक्कर येणे ,पायात गोळे येणे अशक्तपणा, निरुत्साह अशा तक्रारी असतात. काही रुग्णास आधुनिक रक्त वाढीचे औषधे घेऊनही उपयोग होत नाही . अशा वेळी आयुर्वेदातील अश्वगंधा शतावरी मंडूर भस्म भस्म , कोरफड, आवळा इत्यादींनी युक्त औषधांचा खात्रीशीर उपयोग होतो.
४ मानसिक कारणांमुळे : अभ्यासाचा व्यवसायाचा आर्थिक कलहामुळे हा प्रकार होतो. यावर झोपेच्या गोळ्या खात राहण्यापेक्षा आयुर्वेदातील शंखपुष्पी ब्राह्मी ,जटामांसी अश्वगंधा इत्यादी वनौषधी आणि अभ्रक भस्म युक्त मन शक्ती वाढवणारी औषधे आणि शिरोधारा नस्य कर्माने यांचा उपयोग होतो.
५ इतर विकार : कानातील सूज कान फुटणे, रक्तदाब कमी होणे, किंवा वाढणे मद्याचे जास्त सेवन झाल्यास रक्तातील युरियाचे वाढ झाल्याने पीठ चा झटका येऊन गेल्यानंतर अति तंबाखू सेवनामुळे पोट साफ नसणे रक्तातील साखर कमी झाल्याने डोळ्याला नंबर लागलेला असणे दात किडलेला असणे इत्यादी विकारांच्या लक्षण स्वरूप डोके दुखत असते अशावेळी त्या विकारांचे उपचार केल्यावर डोकेदुखी कमी होते .
६ डोकेदुखी नस्य कर्म : आयुर्वेदाची देणगी अनेकांच्या बाबतीत असे लक्षात येते की वरील कारणे असूनही डोकेदुखी तीव्र होत नाही ,कारण ज्यांचे शरीराचे बळ उत्तम असते अशांना डोकेदुखी जाणवत नाही. उदाहरणार्थ पित्ताचा त्रास असणाऱ्या प्रत्येकाचे डोके दुखत नाही डोळे ,नाक ,कान ,घसा ,मेंदू यांचे बल प्रतिकारशक्ती वाढवणारे हे उपचार आयुर्वेदाने सांगितले आहे, तो म्हणजे नसे करून प्रत्येक डोक्याला मानेला मसाज करून वाफेने शेक देऊन नंतर औषधी तेलाचे थेंब नाकात टाकले जातात.