इकॉनॉमी

५ वर्षात ६ रक्षा सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी विकून सरकारने कमावले तब्बल २६.४५ कोटी!

सोमवारी राज्यसभेत रक्षा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सभागृहाला गेल्या ५ वर्षातील रक्षा क्षेत्रात सार्वजनिक उपक्रमातील सरकारी भागीदारी विकण्यासंदर्भात माहिती देताना संगितले की, या विक्रीतून सरकारने २६,४५७ कोटी रुपये जुटवले आहे.सरकारने सर्वाधिक कमाई हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील भागीदारी विकून केली आहे. यातून सरकारने १४,१८४ कोटी रुपये कमवले आहे.
कोणकोणत्या उपक्रमांतून विकली भागीदारी
एका प्रश्नाचे उत्तर देताना नाईकांनी संगितले की, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील भागीदारी विकून सरकारने १४,१८४ कोटी रुपये, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) मधील भागीदारी विकून ८,०७३ कोटी आणि भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल) मधील भागिदारीच्या विक्रीने २,३७१ कोटी रुपये जमवले.
 यासोबतच मिश्र धातू निगम लिमिटेड मधील भागिदारीच्या विक्रीने ४३४ कोटी, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (ग्रिज) पासून ४२० कोटी आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मधील भागीदारी विकून ९७५ कोटी रुपये कमवले.
 रक्षा निर्माण क्षेत्रात वाढत आहे खाजगी भागीदारी. रक्षा क्षेत्रातील विक्री कुठलीही तरतूद किंवा नियम न बदलता केल्या गेल्याची माहिती नाईक यांनी दिलीं. भागीदारी विकलेल्या कंपन्या प्रामुख्याने विमान निर्मिती, मिसाईल निर्मिती, जहाज बांधणी आणि अंतराळात जाणाऱ्या सेटेलाईट उपकरणांच्या निर्मितीमध्ये काम करत आहेत.
BHEL मधील भागीदारी विकू शकतो सरकार.
सरकार भारत हैवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), मेकॉन लिमिटेड आणि एंड्रयू यूल एंड कंपनी लिमिटेड मधली आपली भागीदारी विकू शकते. डिस्इन्वेस्टमेंट पिक च्या पुढच्या काळासाठी या कंपन्यांचा सरकार विचार करत आहे. जेव्हा सरकार कुठलीही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणजे PSU मध आपली काही भागेदारी विकत असते तर याला निर्गुंतवणुक किंवा डिस्इन्वेस्टमेंट म्हणतात.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *