लाइफस्टाइल

गुढीपाडवा हिंदू कालदर्शिके चा पहिला दिवस आणि उत्सव

गुढीपाडवा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.
शालिवाहन संवत्सराची हा पहिला दिवस आहे .
वेदांग ज्योतिषी या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे , या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यावसायिक प्रारंभ उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात . उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतिक असे मानले जाते. गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.
या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात कडूनिंब वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात ,फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांबे किंवा धातूचे भांडे बसवले जाते, तयार केलेली गुढी बांबू पाटावर उभा केली जाते, गुढीला गंध फुले अक्षता वाहतात व निरंजन लावून उदबत्ती दाखवतात, दुपारी नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. या दिवशी आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात, चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमिपुत्रा ची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्यप्राप्ती चा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो . महाराष्ट्रात या सणाला गुढी पाडवा असे संबोधले जाते .
सिंधी लोक चेटी चंड नावाने या उत्सवाला संबोधता .
तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा आहे तसाच तो तोरण असाही आहे , स्नान दैनंदिन कामे झाल्यावर सकाळी गुढी उभारली जाते, वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे देवादिकांचे स्मरण पूजन करतात . गुरु, वडीलधार्‍यांना वंदन करावे अशी ही रूढी आहे , त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावी असा संकेत रूढ आहे ,
संवत्सर फल म्हणजे नेमकं काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती जसे वार चंद्र नक्षत्र सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते संवत्सर फलात आल्याचाही निर्देश असतो . म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते . वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्राप्त काळी मिरी, ओवा ,मीठ आणि साखर कडूनिंबाच्या पाना बरोबर वाटून खातात त्यामुळे पचनक्रिया सुधारते करते , त्वचारोग बरे करते धान्यातील कीड थांबवने असे आणि औषधी उपयोग या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते, शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालून वाटून खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक मानले जाते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *