इकॉनॉमी

कोरोना काळात सर्व ठप्प ! परंतु अदानीच्या संपत्तीत जगात सर्वाधिक वाढ!

भारतातील नामांकित उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती या वर्षी जगात सर्वाधिक गतीने वाढली आहे.अडाणीची संपत्ती २०२१ मध्ये १६.२ अरब डॉलरपर्यंत वाढली आहे.
ब्लुमबर्ग बिलियनेयर इडेक्सच्या ताज्या अहवालानुसार आता अडानीची संपत्ती ५० अरब डॉलर इतकी झाली आहे. यामुळे ते सर्वात जास्त कमाई करणारे अरबपती बनले आहे.

अडाणी ग्रुपचे जवळपास सर्वच स्टोक्स तीन महिन्यातच ५० टक्क्यांवरून जास्त उंचावले आहे.
यावेळी गौतम अदानीची संपत्ती एलन मस्क आणि अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस पेक्षाही जास्त वेगाने वाढली.
अदानी सोबतच एशिया आणि भारताचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांंनी यादरम्यान ८.१ अरब डॉलरची संपत्ती जोडली आहे. म्हणजेच अदानीच्या तुलनेत त्यांची संपत्ती वाढ अर्धीच राहिली.

गौतम अदानी मागील काही वर्षांपासून देश विदेशातील कंपन्यांमध्ये भारी गुंतवणूक करत आहेत. टोटल पासून वॉरबर्ग पिनकस सारख्या कंपन्या ते अनेक बंदर, विमानतळ, डेटा सेंटर, आणि कोळसा खदानीपर्यंतच्या प्रोजेक्ट्समध्ये पैसा गुंतवून त्यांनी संपत्तीमध्ये भरघोस वाढ केली आहे.

अदानीवर देशात आर्थिक मक्तेदारी निर्माण करण्याचे वारंवार आरोप होत आले आहे. सत्तारूढ पक्षात त्यांचे हितसंबंध असून अनेक सरकारी संपत्ती आणि कंपन्या विकत घेण्याचा आरोप त्यांच्यावर होत असतो. आता त्यांच्या संपत्तीत अशी भरघोस वाढ दिसल्याने त्यांची आर्थिक प्रगती जोमात सुरू असल्याबद्दल शंकाच नाही.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *